ETV Bharat / state

'निसर्ग' पुढे सरकणार; एकनाथ शिंदेंनी कंट्रोल रूममधून घेतला आढावा, शहापूरला यंत्रणा सतर्क - eknath shinde thane news

चक्रीवादळ आता शहापूर डोंबवली भागातून पुढे सरकणार आहे. त्यामुळे शहापूर भागातील उंचावर असलेल्या घरातील लोकांना हलवण्यात आले आहे. तर, यासाठी एक एनडीआरएफची टीमदेखील या ठिकाणी पाठवण्यात आली आहे. त्याच बरोबर डोंबवली भागातील जुन्या तसेच, धोकादायक इमारतीतील घरेही खाली करण्यात आली आहेत. त्याच बरोबर सर्वच खाडीकिनारी परिसरात एनडीआरएफ व एसडीआरएफचे पथकं तैनात करण्यात आली आहेत.

एकनाथ शिंदेंनी कंट्रोल रूममधून घेतला आढाला

author img

By

Published : Jun 3, 2020, 5:17 PM IST

ठाणे - अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने तयार झालेले निसर्ग चक्रीवादळ हे महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर आज दुपारच्या सुमारास येऊन धडकले. या वादळाचा फटका ठाण्यातील खाडीच्या किनारी भागाला देखील बसू शकतो. त्यामुळे ठाण्यात राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची टीम दाखल झाली आहे. तर, शहापूरला एनडीआरएफची यंत्रणा तैनात आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे कलेक्टर कंट्रोल रुममध्ये उपस्थित राहून परिस्थितीचा आढावा घेतला.

निसर्ग चक्रीवादळ आता शहापूर डोंबवली भागातून पुढे सरकणार आहे. त्यामुळे शहापूर भागातील उंचावर असलेल्या घरातील लोकांना हलवण्यात आले आहे. तर, यासाठी एक एनडीआरएफची टीमदेखील या ठिकाणी पाठवण्यात आली आहे. त्याच बरोबर डोंबवली भागातील जुन्या तसेच, धोकादायक इमारतीतील घरेही खाली करण्यात आली आहेत. तर भाईनंद, उत्तन, कल्याण-डोंबवली, त्याच बरोबर सर्वच खाडीकिनारी परिसरात एनडीआरएफ व एसडीआरएफचे पथकं तैनात करण्यात आली आहेत.

अजून तरी ठाण्याला या वादळाचा फटका बसला नाही. तरीही प्रशासनाची सर्व यंत्राने सज्ज आहेत अशी माहिती पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ते ठाणे कलेक्टर कंट्रोल रूममध्ये वादळाचा आढावा घेण्यासाठी आले होते. त्यांनी कंट्रोल रूममधून सर्वच तहसीलदार यांना फोन करून वादळबाबत माहिती घेतली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.