ETV Bharat / state

कुडाच्या झोपडीत भरते आदिवासी विद्यार्थ्यांची शाळा.. शिक्षण विभाग उदासीनच! - tribal students school in bad condition shahapur

शहापूर तालुक्यातील तांबडमाळ येथील आदिवासी मुलांनाही शिक्षणाचा अधिकार मिळावा, यासाठी 2001 साली येथे वस्ती शाळा सुरू करण्यात आली होती. विशेष म्हणजे ही शाळा त्यावेळी आदिवसी पाडयातील शिक्षणाचे महत्व जाणणाऱ्यांच्या घरात भरत असे. यानंतर 2008 साली या शाळेला जिल्हा परिषद शाळेचा दर्जा देण्यात आला आणि याठिकाणी दोन शिक्षकांची नेमणूक करण्यात आली.

government school in bad condition in thane education department lazy
शिक्षण विभाग उदासीन; आदिवासी विद्यार्थ्यांची शाळा कुडाच्या झोपड्यात
author img

By

Published : Feb 9, 2020, 8:51 AM IST

Updated : Feb 9, 2020, 3:20 PM IST

ठाणे - शहापूर नगरपंचायत हद्दीतील तांबडमाळ येथील आदिवासी पाड्यात जिल्हा परिषदेची शाळा आहे. मात्र, या शाळेत पंचायत समिती शिक्षण विभाग आणि शहापूर नगरपंचायत अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे ८ वर्षांपासून आदिवासी विद्यार्थ्यांना कुडाच्या झोपड्यात बसून शिक्षण घ्यावे लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे.

कुडाच्या झोपडीत भरते आदिवासी विद्यार्थ्यांची शाळा..

शहापूर तालुक्यातील तांबडमाळ येथील आदिवासी मुलांनाही शिक्षणाचा अधिकार मिळावा, यासाठी 2001 साली येथे वसती शाळा सुरू करण्यात आली होती. विशेष म्हणजे ही शाळा त्यावेळी आदिवासी पाड्यातील शिक्षणाचे महत्व जाणणाऱ्यांच्या घरात भरत असे. यानंतर 2008 साली या शाळेला जिल्हा परिषद शाळेचा दर्जा देण्यात आला आणि याठिकाणी दोन शिक्षकांची नेमणूक करण्यात आली.

आता शाळा अस्तिवात असलेली जागा वन विभागाची आहे. यामुळे 2012 सालापासून शाळेच्या (वर्गखोल्या) इमारतीच्या बांधकामासाठी येथील शिक्षकांनी प्रयत्न सुरू केले. मात्र, शहापूर पंचायत समिती शिक्षण विभाग आणि शहापूर नगरपंचायत यांच्याकडून कोणताही प्रकारच्या कागदपत्रांची पूर्तता वन विभागाकडे न केल्याने शाळेच्या जागेचा प्रश्न प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा - मानसी नाईक यांच्याशी गैरवर्तन करणाऱ्याला अटक,चार दिवसांची पोलीस कोठडी

दरम्यान, शाळेतील शिक्षकांकडून कागदांपत्रांची पूर्तता केल्यांनतर वन विभागाने सव्वा दोन गुंठे जागा शाळेसाठी दिली आहे. मात्र, पंचायत समिती शिक्षण विभाग आणि शहापूर नगरपंचायत प्रशासनाच्या उदासीनतेमुळे आजपर्यंत जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत (वर्गखोल्या) बांधण्यात आली नाही. त्यामुळे आजही आदिवासी विद्यार्थ्यांना झोपडीतच बसून शिक्षण घ्यावे लागत आहे.

हेही वाचा - 'मेहनती व अभ्यासू उद्योजक राज्याने गमावला'

दुसरीकडे, तांबडमाळ आदिवासी वसतीतील विद्यार्थ्यांच्या पालकांकडून शाळेची इमारत लवकरात लवकर उभारण्यात यावी अशी मागणी पुढे आली आहे. आता पंचायत समिती आणि शिक्षण विभाग या शाळेच्या इमारतीचा प्रश्न किती गांभीर्याने घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Intro:kit 319Body: शिक्षण विभागाच्या उदासीनतेमुळे आदिवासी विद्यार्थ्यांची शाळा कुडाच्या झोपड्यात

ठाणे : शहापूर नगरपंचायत हद्दीतील तांबडमाळ येथील आदिवासी पाड्यात जिल्हा परिषदेची शाळा आहे. मात्र पंचायत समीती शिक्षण विभाग व शहापूर नगरपंचायत अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे ८ वर्षांपासून आदिवासी विद्यार्थांना कुडाच्या झोपड्यात बसून शिक्षण घेत असल्याचे वास्तव समोर आले आहे.
शहापूर तालुक्यातील तांबडमाळ येथील आदिवासी मुलांनाही शिक्षणाचा अधिकार मिळवा यासाठी 2001 साली येथे वस्ती शाळा सुरू करण्यात आली होती. विशेष म्हणजे हि शाळा त्यावेळी आदिवसी पाडयातील शिक्षणाचे महत्व जाणणाऱ्याच्या घरात भरत असे, तद्नंतर 2008 साली या शाळेला जिल्हा परीषद शाळेचा दर्जा देवून या शाळेत दोन शिक्षकांची नेमणूक करण्यात आली. आता ज्या ठिकाणी हि शाळा अस्तिवात आहे. हि जागा वन विभागाची असल्याने 2012 सालापासून शाळेच्या (वर्गखोल्या) इमारतीच्या बांधकामासाठी येथील शिक्षकांनी प्रयत्न सुरू केले. मात्र शहापूर पंचायत समीती शिक्षण विभाग व शहापूर नगरपंचायत यांच्याकडून कोणताही प्रकारचे कागदापत्राची पुरतता वन विभागाकडे न केल्याने या शाळेच्या जागेचा प्रश्न प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, शाळेतील शिक्षकांकडून कागदांपत्रांची पूर्तता केल्यांनतर वन विभागाने सव्वा दोन गुंठे जागा शाळेसाठी दिली आहे. मात्र पंचायत समीती शिक्षण विभाग व शहापूर नगरपंचायत प्रशासनाच्या उदासीनतेमुळे आजपर्यंत जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत (वर्गखोल्या) बांधण्यात आली नाही. त्यामुळे आजही आदिवासी विद्यार्थांना झोपडीतच बसून शिक्षण घ्यावे लागत आहे.
दुसरीकडे तांबडमाळ आदिवासी वस्तीतील विध्यार्थीच्या पालकांकडून शाळेची इमारत लवकरात लवकर उभारण्यात यावी अशी मागणी पुढे आली असून आता पंचायत समीती शिक्षण विभाग या शाळेच्या इमारतीचा प्रश्न किती गांभीयाने घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Conclusion:shahapur
Last Updated : Feb 9, 2020, 3:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.