ETV Bharat / state

Goods Train Derailed: इगतपुरीवरून कसाराकडे येणारी मालगाडी रुळावरून घसरली; इंजिन आणि बोगी रुळावर आणण्यात यश - goods train coming from Igatpuri to Kasara

इगतपुरीवरून कसरा रेल्वे स्थानकाच्या दिशेने येणाऱ्या (पार्सल यान) ही मालगाडी आज (गुरुवारी) सायंकाळच्या सुमारास येत होती. त्याच वेळी इंजिन व ५ नंबरची ची बोगी रेल्वे रुळावरून घसरल्याची घटना घडली. अखेर रेल्वे कर्मचाऱ्यांना घसरलेले इंजिन आणि बोगी रुळावर आणण्यात यश आले आहे.

Goods Train Derailed
रेल्वे रुळावरून घसरली
author img

By

Published : Jun 22, 2023, 6:28 PM IST

Updated : Jun 22, 2023, 7:42 PM IST

रुळावरून घसरलेली हीच ती मालगाडी

ठाणे: इगतपुरी वरून कसरा रेल्वे स्थानकाच्या दिशेने येणाऱ्या (पार्सल यान) ही मालगाडी आज (गुरुवारी) दुपारच्या सुमारास येत होती. त्याच वेळी इंजिन व ५ नंबरची ची बोगी रेल्वे रुळावरून घसरल्याची घटना घडली आहे. मात्र, मुंबईच्या दिशेने आणि इगतपुरीच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या सुरळीत सुरू आहेत. सध्या घटनास्थळी रेल्वे प्रशासनाकडून इंजिन व ५ नंबरची बोगी रुळावर आणण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. तर दुर्घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याचे सांगण्यात आले. सध्या घटनास्थळी रेल्वे प्रशासनाकडून इंजिन व ५ नंबरची बोगी रुळावर आणण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करून रेल्वे रुळावर इंजिन आणि घसरलेला डब्बा पूर्वरत करण्यात आला.

रेल्वे वाहतुकीवर परिमाण नाही: दरम्यान मध्य रेल्वेचे जनसंर्पक अधिकारी ए. के. सिंह यांच्याशी संर्पक साधला असता, सदरची मालगाडी दुर्घटनेवेळी कसारा रेल्वे स्थानकानजीक असलेल्या रेल्वे यार्ड मध्ये होती. त्यामुळे रेल्वे वाहतुकीवर कुठलाही परिमाण झाला नाही. शिवाय दुर्घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याचे सांगण्यात आले.

ओडिशा अपघाताप्रकरणी एफआयआर दाखल: ओडिशा रेल्वे अपघातात रेल्वे पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. बालासोर जीआरपीएसचे एसआय पपू कुमार नाईक यांच्या तक्रारीनंतर हा एफआयआर नोंदवण्यात आला आहे. बालासोर रेल्वे अपघातात कटक येथील सरकारी रेल्वे पोलिसांनी (GRP) अज्ञात व्यक्तींविरुद्ध रेल्वे कायद्याच्या कलम 153, 154 आणि 175 अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. बालासोर जीआरपीएसचे एसआय पपू कुमार नाईक यांच्या तक्रारीनंतर हा एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

ओडिशा ट्रेन अपघात कसा घडला? : कोरोमंडल एक्सप्रेस, हावडा सुपरफास्ट एक्सप्रेस आणि बहनगा बाजार स्थानकावर आधीच उभी असलेली मालगाडी या तीन गाड्यांची टक्कर झाली. हा भारतातील आत्तापर्यंतचा पाचवा सर्वात प्राणघातक रेल्वे अपघात आहे. कोणती ट्रेन प्रथम रुळावरून घसरली याची अद्याप पुष्टी झालेली नाही परंतु रेल्वेचे प्रवक्ते अमिताभ शर्मा म्हणाले की, कोरोमंडल एक्स्प्रेस जी पश्चिम बंगालमधील शालीमार रेल्वे स्थानकावरून येत होती, तिने प्रथम नियंत्रण गमावले. ती स्थानकावर उभ्या असलेल्या मालगाडीला धडकली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अपघाताच्या वेळी तेथून जात असलेल्या हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेसलाही धडक बसली.

Last Updated : Jun 22, 2023, 7:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.