ETV Bharat / state

आईला वाचवताना पाण्यात बुडालेल्या लावण्याचा मृतदेह सापडला

काटई -बदलापूर पाईपलाईन रोड परिसरात असलेल्या खदाणीत आई आणि लहान बहिणीला वाचवताना पाण्यात बुडालेल्या मुलीचा मृतदेह सोमवारी आढळून आला आहे. लावण्या शेटी वय 16 असे या मुलीचे नाव आहे.

author img

By

Published : Dec 28, 2020, 7:03 PM IST

girl drowned in water thane
लावण्या शेटी

ठाणे - काटई -बदलापूर पाईपलाईन रोड परिसरात असलेल्या खदाणीत आई आणि लहान बहिणीला वाचवताना पाण्यात बुडालेल्या मुलीचा मृतदेह सोमवारी आढळून आला आहे. लावण्या शेटी वय 16 असे या मुलीचे नाव आहे.

आई आणि बहिणीला वाचवण्यासाठी घेतली पाण्यात उडी

कल्याण तालुक्यातील हेदुटणे गावात राहणाऱ्या गीता शेट्टी यांचे पती रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. शेट्टी दाम्पत्याला परी (4) आणि लावण्या (16) या दोन मुली आहेत. या गावात गेल्या दोन दिवसांपासून पाणी नसल्याने गीता या रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास परी आणि लावण्यासह कपडे धुण्यासाठी राणी ढाब्यामागील खदाणीत गेल्या हेत्या. यावेळी खेळताना परीचा पाय घसरला आणि ती खदाणीत पडली. लेकीला वाचवण्यासाठी गीता यांनी परीच्या दिशेने पाण्यात उडी घेतली. परी आणि गीता या दोघेही पाण्यात बुडू लागल्या, ते पाहून गीता यांची दुसरी मुलगी लावण्याने पाण्यात उडी घेतली. तीने आई व लहाण बहिणीचा जीव वाचवला मात्र ती पाण्यात बुडाली.

सोमवारी आढळला लावण्याचा मृतदेह

दरम्यान घटनेची माहिती मिळताच मानपाड पोलिसांसह अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी रेस्क्यू बोटीद्वारे बेपत्ता असलेल्या लावण्याचा शोध घेतला. मात्र अंधार पडल्याने शोधमोहीम थांबवण्यात आली. सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास बेपत्ता झालेल्या लावण्याचा मृतदेह खदणीतल्या पाण्यावर तरंगताना आढळून आला. अग्निशमन दलाच्या जवानांनी मृतदेह खदाणीतून बाहेर काढला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून लावण्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी केडीएमसीच्या रुख्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये पाठवून दिला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.