ETV Bharat / state

ठाण्यात इमारतीच्या स्लॅबचे प्लास्टर अंगावर कोसळून ११ वर्षीय मुलीचा मृत्यू

प्लास्टरचा मोठा भाग साक्षी हिच्या डोक्यात व छातीवर पडल्याने या दुर्घटनेत तिचा मृत्यू झाला आहे. तर आई स्नेहा व बहीण प्रगती किरकोळ जखमी झाल्या.

author img

By

Published : Jun 26, 2019, 3:55 PM IST

ठाण्यात इमारतीच्या स्लॅबचे प्लास्टर अंगावर कोसळून ११ वर्षीय मुलीचा मृत्यू

ठाणे - दुमजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील एका रुममधील स्लॅबचे प्लास्टर कोसळून घरात आईसोबत झोपलेल्या एका अकरा वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यात आई व एक मुलगी किरकोळ जखमी झाली आहे. साक्षी उमेश एनगुंदला (वय ११), असे मृत मुलीचे नाव आहे. ती सहाव्या वर्गात शिक्षण घेत होती.

ही घटना भिवंडी शहरातील पदमानगर परीसरातील गणेश टॉकीज जवळील मार्कंडेय नगर येथील गंगाजमुना इमारतीमध्ये घडली आहे. ही इमारत सुमारे ३० वर्ष जुनी असून तळ अधिक २ मजली अरुंद इमारत आहे. या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील खोलीत उमेश एनगुंदला याची पत्नी स्नेहा व दोन मुली मागील दोन वर्षांपासुन भाड्याने खोली घेऊन राहत होते. पती उमेश कामावर जाऊन आल्यावर रात्री उशीरापर्यंत आपल्या मित्रांसोबत गप्पा मारत परीसरातच बसला होता. तर घरात पत्नी स्नेहा मृत मुलगी साक्षी व जखमी प्रगती या मुलींसोबत झोपली होती. अचानक रात्री अकरा वाजताच्या सुमारास त्यांच्या खोलीतील स्लॅबचे प्लास्टर कोसळले. त्यावेळी प्लास्टरचा मोठा भाग साक्षी हिच्या डोक्यात व छातीवर पडल्याने या दुर्घटनेत तिचा मृत्यू झाला आहे. तर आई स्नेहा व बहीण प्रगती किरकोळ जखमी झाल्या. साक्षी हिला उपचारासाठी स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयात दाखल करण्यासाठी गेले असता येथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

विशेष म्हणजे भिवंडी महानगरपालिका हद्दीत जीर्ण इमारतींची संख्या २९०च्या वर आहे. याहून दुर्दैव म्हणजे या घटनेची माहिती भिवंडी महानगरपालिका आपत्कालीन कक्ष व अग्निशामक दलास ३ तास माहितच नव्हती. तीन तासानंतर महानगरपालिका आपत्कालीन कक्ष व अग्निशामक दल घटनास्थळी पाहणी करण्यासाठी दाखल झाले होते. यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली होती.

इमारतीच्या स्लॅबचे प्लास्टर अंगावर कोसळून अकरा वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यु

ठाणे :-दुमजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील एका रुम मधील स्लॅबचे प्लास्टर कोसळून घरात आई सोबत झोपलेल्या एका अकरा वर्षीय मुलीचा मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तर आई व एक मुलगी किरकोळ जखमी झाली आहे. साक्षी उमेश एनगुंदला (११) असे मृत मुलीचे नाव आहे. ती सहाव्या वर्गात शिक्षण घेत होती.  

हि घटना भिवंडी शहरातील पदमानगर परीसरातील गणेश टोकीज जवळील मार्क॔डेय नगर येथील गंगाजमुना इमारतीमध्ये घडली आहे. ही इमारत सुमारे तिस वर्ष जुनी असून तळ अधिक दोन मजली अरुंद इमारत आहे. या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील खोलीत उमेश एनगुंदला याची पत्नी स्नेहा व दोन मुली मागील दोन वर्षांपासुन भाड्याने खोली घेऊन राहत होते. पती उमेश कामावर जाऊन आल्यावर रात्री उशीरापर्यंत आपल्या मित्रांसोबत गप्पा मारत परीसरातच बसला होता. तर घरात पत्नी स्नेहा मृतक मुलगी साक्षी व जखमी प्रगती या मुलींसोबत झोपली होती. मात्र अचानक रात्री अकरा वाजताच्या सुमारास त्यांच्या खोलीतील स्लॅबचे प्लास्टर कोसळले. त्यावेळी प्लास्टरचा मोठा भाग साक्षी हिच्या डोक्यात व छातीवर पडल्याने या दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यु झाला आहे. तर आई स्नेहा व बहीण प्रगती किरकोळ जखमी झाल्या असुन साक्षी हिला उपचारासाठी स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयात दाखल करण्यासाठी गेले असता येथील डॉक्टरांनी तिला मृतक घोषित केले. 

विशेष म्हणजे भिवंडी महानगरपालिका हद्दीत जीर्ण इमारतींची संख्या २९०च्या वर आहे. व याहून दुर्दैव म्हणजे या घटनेची माहिती भिवंडी महानगरपालिका आपत्कालीन कक्ष व अग्निशामक दलास तीन तास माहीतच नव्हती. तीन तासानंतर महानगरपालिका आपत्कालीन कक्ष व अग्निशामक दल घटनास्थळी पाहणी करण्यासाठी दाखल झाले होते. यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.