ETV Bharat / state

भंगार दुकानात गॅस सिलेंडरचा स्फोट, तीन जखमी

Cylinder Explosion In Mumbra : मुंब्रा येथील कौसा परिसरातील मुघल पार्क इमारतीत शनिवारी पहाटे एका भंगार दुकानात गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आहे. यात तीन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.

Cylinder Explosion In Mumbra
Cylinder Explosion In Mumbra
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 25, 2023, 7:05 PM IST

स्थानिकांच्या प्रतिक्रिया

ठाणे Cylinder Explosion In Mumbra : मुंब्रा येथील परिसरातील मुघल पार्क इमारतीत शनिवारी पहाटे एका भंगार दुकानात गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन तीन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटामुळं आजूबाजूच्या इमारतीचंही नुकसान झालं आहे. तसंच दोन वाहनांसह जवळपासच्या इमारतींमधील घरांच्या खिडक्यांचं नुकसान झालं आहे. स्फोटामुळे इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील भिंतीला तडे गेल्यानं इमारत धोकादायक बनली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून ठाणे महापालिका प्रशासनानं 76 रहिवाशांची राहण्याची व्यवस्था जवळच्या शाळेत केली आहे.

तीन किरकोळ जखमी : मुंब्य्रातील मस्जिद रोड, चांद नगर, कौसा या ठिकाणी मुघल पार्क इमारत 4 मजल्यांची आहे. या इमारतीमध्ये एकूण 25 रुम तसंच 4 दुकानांचे गाळे आहेत. तळ मजल्यावरील गाळा नं. 3 दुकानामध्ये ठेवलेल्या गॅस सिलेंडरचा आज पहाटे 6 च्या दरम्यान स्फोट झाला. स्फोटाच्या घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी, अग्निशमन दलाचे कर्मचारी, टोरेंट पॉवर कंपनीचे कर्मचारी तसंच मुंब्रा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यामध्ये तिघे किरकोळ जखमी झाले आहेत.

धोकादायक इमारत रिकामी : जखमींपैकी अजहर शेख यांच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली असून उपचाराकरता त्यांना बिलाल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.अर्षू सय्यद ( 10 वर्षे ) या मुलाच्या हाताला दुखावत झाली आहे, तर जिनत मुलानी (५० वर्षे) यांच्या चेहऱ्याला किरकोळ दुखापत झाली. त्यांनाही उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या स्फोटामुळं समोरील फरिदा बाद बिल्डिंगच्या काही घराच्या काचा फुटल्या आहेत. तळमजल्यावर असलेल्या 8 दुकानांच्या शटरचं, इतर साहित्याचं नुकसान झालं असून धोकादायक इमारत रिकामी करण्यात आली आहे.

हेही वाचा -

  1. ठाण्यात इमारतीला आग; एकाच कुटुंबातील दोघांचा होरपळून मृत्यू, तिघांना वाचवण्यात यश
  2. जेवण, दारू आणण्यास उशीर झाल्यानं गुंडांचा पारा चढला; हॉटेल स्टाफवर केला चॉपरनं हल्ला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.