ETV Bharat / state

सेनेच्या बाळ्यामामाचे नाव घेताच पालकमंत्र्यांचे घुमजाव; युतीच्या मेळाव्यात रिपाइंही नाराज - election

गेल्या दोन वर्षापासून बाळामामा निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे, मात्र भाजपने पुन्हा कपिल पाटील यांना युतीचे उमेदवार घोषित केले आहे. त्यामुळे गेल्या महिन्यापासून बाळामामा काँग्रेसकडून तिकिट मिळवण्यासाठी दिल्ली वारी करत आहेत.

सेनेच्या बाळ्यामामाचे नाव घेताच पालकमंत्र्यांचे घुमजाव
author img

By

Published : Mar 26, 2019, 11:22 PM IST

ठाणे - भिवंडी लोकसभेच्या मतदारसंघासाठी भाजप-शिवसेना-रिपाइं कार्यकर्त्यांचा मेळावा कल्याण पश्चिममध्ये आयोजित केला होता. या मेळाव्यात पत्रकारांनी पालकमंत्री एकनाथ शिंदेंना बाळूमामा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे का? असा प्रश्न विचारताच पालकमंत्र्यांनी पत्रकारांनाच प्रतिप्रश्न विचारून घूमजाव केल्याचे दिसून आले आहे.

सेनेच्या बाळ्यामामाचे नाव घेताच पालकमंत्र्यांचे घुमजाव

भिवंडी लोकसभेत शिवसेनेकडून बंडाचा झेंडा फडकवणाऱ्या ठाणे ग्रामीणचे संपर्कप्रमुख सुरेश म्हात्रे उर्फ बाळामामा यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी केल्याने भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे गेल्या दोन वर्षापासून बाळामामा निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे, मात्र भाजपने पुन्हा कपिल पाटील यांना युतीचे उमेदवार घोषित केले आहे. त्यामुळे गेल्या महिन्यापासून बाळामामा काँग्रेसकडून तिकिट मिळवण्यासाठी दिल्ली वारी करत आहेत. माजी खासदार सुरेश टावरे यांना काँग्रेसचे उमेदवार घोषित केल्याने आता बाळा मामा अपक्ष लढवण्याच्या मनस्थितीत आहेत. याच प्रश्नावर पत्रकाराने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले असता एकदा युतीने कपिल पाटील यांची घोषित केल्यावर त्यांचा प्रश्नच येत नाही तुम्हाला बाळामामाने सांगितले का? असा उलट प्रश्न विचारत पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देणे टाळले, यामुळे आजही भाजप-शिवसेना दुरावा कायम असल्याचे दिसून आले आहे.

भर मिळाव्यात रिपाइं प्रदेश उपाध्यक्षची नाराजी

रिपाइंचे प्रदेश उपाध्यक्ष अण्णा रोकडे यांनी तर भर मेळाव्यात शिवसेना भाजपच्या दोन पालकमंत्री व पदाधिकाऱ्यांसमोर प्रचंड नाराजी व्यक्त केली. रोकडे यांनी भाषणात सांगितले की, रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांना तुम्ही मंत्री बनवले मात्र सर्वसामान्य रिपाइंच्या कार्यकर्त्याचा काय? असा सवाल उपस्थित करीत आमचे कोणी ऐकून घेत नाही, रिपाइंचा कार्यकर्ता तुमच्यासाठी झटतो, त्याला काही भेटत नाही तुमच्या पक्षाच्या लोकांना पदे दिली जातात, मात्र आमच्या कार्यकर्त्यांना एसीओ पद मिळत नाही खासदार श्रीकांत शिंदे यांनी तर आमच्या कार्यकर्त्यांबद्दल अजूनही सहानुभूती दाखवत नाही. त्यांनी आमच्या दलित वस्तीच्या नागरिक सुविधांचा निधीही दिला नाही. आम्ही तुम्हाला सहकार्य देतो मात्र आमच्यासारख्यांना मान द्या, असे सांगत त्यांनी प्रचंड युतीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. कल्याण आणि भिवंडी लोकसभेत या नाराजीचा फटका युतीच्या उमेदवारांना बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Intro:किट नंबर 319
कल्याण

Body:शिवसेनेच्या बाळ्यामामाच नाव घेताच पालकमंत्र्यांचे घुमजाव, युतीच्या मेळाव्यात रिपाईही नाराज

ठाणे:- भिवंडी लोकसभेतील भाजप-शिवसेना-रिपाइं कार्यकर्त्यांचा मेळावा कल्याण पश्चिमेला आयोजित केला होता, हा मेळावा संपल्यानंतर पालक मंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रकारांनी बाळूमामा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे का असा प्रश्न विचारताच पालकमंत्र्यांनी छुपी साधत उलट पत्रकारांनाच प्रति प्रश्न विचारून घूमजाव केल्याचे दिसून आले आहे,

भिवंडी लोकसभेत शिवसेनेकडून बंडाचा झेंडा फडकवणाऱ्या ठाणे ग्रामीणचे संपर्कप्रमुख सुरेश म्हात्रे उर्फ बाळ मामा यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी केल्याने भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे विशेष म्हणजे गेल्या दोन वर्षापासून बाळमामा निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे मात्र पुन्हा भाजपचे खासदार कपिल पाटील यांना युतीने उमेदवार घोषित केल्याने गेल्या महिन्यापासून बाळूमामाचे काँग्रेसच्या तिकिटासाठी दिल्ली वारी सुरू होती मात्र येथेही माजी खासदार सुरेश टावरे यांना काँग्रेसचे उमेदवार घोषित केल्याने आता बाळा मामा अपक्ष लढवण्याच्या मनस्थितीत आहे, याच प्रश्नावर पत्रकाराने पालक मंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले असता एकदा युतीने कपिल पाटील यांची घोषित केल्यावर त्यांचा प्रश्नच येत नाही तुम्हाला बाळा मामाने सांगितले का ? असा उलट प्रश्न विचारत पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देणे टाळले, यामुळे आजही भाजप-शिवसेना दुरावा कायम असल्याचे दिसून आले आहे,

भर मिळाव्यात रिपाई प्रदेश उपाध्यक्षची नाराजी

रिपाइंचे प्रदेश उपाध्यक्ष अण्णा रोकडे यांनी तर भर मेळाव्यात शिवसेना भाजपच्या दोन पालक मंत्री व पदाधिकाऱ्यांसमोर प्रचंड नाराजी व्यक्त केली, रोकडे यांनी भाषणात सांगितले की, रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांना तूम्ही मंत्री बनवलं मात्र सर्वसामान्य रिपाईच्या कार्यकर्त्याचा काय ? असा सवाल उपस्थित करीत आमचं कोणी ऐकून घेत नाही, रिपाईचा कार्यकर्ता तुमच्यासाठी झटतो , त्याला काही भेटत नाही तुमच्या पक्षाच्या लोकांना पदर दिली जातात, मात्र आमच्या कार्यकर्त्यांना एसीओ पद मिळत नाही खासदार श्रीकांत शिंदे यांनी तर आमच्या कार्यकर्त्यांबद्दल अजूनही सहानुभूती दाखवत नाही त्यांनी आमच्या दलित वस्तीच्या नागरिक सुविधांचा निधीही दिला नाही आम्ही तुम्हाला सहकार्य देतो मात्र आमच्यासारख्यांना मान द्या असे सांगत त्यांनी प्रचंड युतीबाबत नाराजी व्यक्त केली आहे यामुळे कल्याण आणि भिवंडी लोकसभेत या नाराजीचा फटका युतीच्या उमेदवारांना बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे

Conclusion:भिवंडी लोकसभा युतीच्या कार्यकत्यांचं मेळाव्यात नाराजी
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.