ETV Bharat / state

Ganesh Festival २०२३ : चित्रकारानं पर्यावरण बचाव देखावा साकारत गणरायाला घातलं 'हे' साकडं; पाहा व्हिडिओ - ganeshotsav 2023

Ganesh Festival २०२३ : गणेशोत्सवात गणरायासमोर सजावटीसाठी विविध देखावे करण्यात येतात. ठाण्यातील मुरबाडच्या एका चित्रकारानं आपल्या चित्रकलेच्या माध्यामध्यातून गणरायासमोर पर्यावरणचा देखावा साकारुन सजावट केलीय. याद्वारे त्यांने पर्यावरण बचावासाठी गणरायाकडे प्रार्थना केल्याचे त्यांनी सांगितलंय. सचिन पोतदार असं या चित्रकाराचे नाव आहे.

Ganesh Festival 2023
Ganesh Festival 2023
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 21, 2023, 7:51 AM IST

गणरायासमोर चित्रकारानं पर्यावरण बचाव देखावा साकारला

ठाणे : Ganesh Festival २०२३ : ठाण्यातील मुरबाडच्या एका चित्रकारानं गणरायासमोर आपल्या चित्रकलेच्या माध्यामध्यातून पर्यावरणचा देखावा साकारत सजावट केलीय. विशेष म्हणजे या चित्रकारानं गणपतीला साकडं घालून पर्यावरण बचावासाठी प्रार्थनाही केली आहे. सचिन पोतदार असं या चित्रकाराचे नाव आहे. ( Environment Protect Scene in front of Lord ganesha )

व्यंग चित्र काढत पर्यावरण बचावाचा संदेश : सध्याच्या घडीला सर्वत्र पर्यावरणाचा नाश करून झाडे, जंगल नष्ट होत आहेत. त्यामुळे येत्या काळात पुरेसे पाणीही मिळणार नसल्याचे या चित्रकाराने आपल्या चित्रकलेच्या माध्यामध्यातून देखावा साकारत गणरायाची सजावट केलीय. गेल्या काही वर्षात मुरबाड तसेच ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात लाकूड माफियांकडून झाडे तोडून नष्ट केली जात आहेत. यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत असून पुरेसे पाणीही येत्या काळात नागरिकांना उपलब्ध होणार नाही. या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी गणपतीची पर्यावरणपुरक सजावट करत एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न या चित्रकाराने केलाय. तसेच पर्यावरण वाचवण्याचं साकडही गणपती बाप्पाला घातल्याचं या चित्रकार सचिन पोतदारांनी सांगितलंय. त्यांनी आपल्या चित्रांमध्ये झाडे, पाणी, पर्यावरणपूर्वक देखावा तयार करून व्यंग चित्रे काढत पर्यावरण बचावाला वाचा फोडण्याचा प्रयत्न केल्याचंही चित्रकार सचिन पोतदारांनी सांगितलंय.

प्रत्येकवर्षी चित्रकलेतून गणरायाची सजावट : चित्रकार सचिन पोतदार यांच्या घरी गेल्या ५२ वर्षांपासून प्रत्यके वर्षी १० दिवस गणेशोत्सव साजरा केला जातो. दरवर्षी ते आपल्या चित्रकलेच्या माध्यमातून गणरायाची सजावट करत लक्ष वेधत एसतात. गेल्या वर्षी त्यांनी वाढत्या महागाईवर देखावा आपल्या चित्रकलेतुन गणरायाच्या सजावटीत साकारला होता. त्यावेळी कोरोना पेक्षाही महागाईचा रोग भयंकर असल्याने यावर उपाय म्हणून आपण व्यंग चित्राद्वारे महागाईला वाचा फोडण्याचा प्रयत्न करून बाप्पाकडे महागाई कमी होण्यासाठी साकडे घेतल्याचं चित्रकार सचिन पोतदारांयनी त्यावेळी सांगितलं होत.

हेही वाचा :

  1. Ganesh Festival 2023: मानाच्या गणपतीसह राजकीय नेत्यांच्या घरी थाटात बाप्पाचं आगमन, गणेशचतुर्थीचे आजचे फोटो पाहा
  2. Richest Ganpati in Mumbai : काय सांगता! 69 किलो सोन्यासह 336 किलो चांदीनं बनली 'या' बाप्पाची मूर्ती
  3. Ganesh festival 2023 in Mumbai: मुंबईत १३ हजारांहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त, वाहतुकीकरिता 'असा' असणार बदल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.