ETV Bharat / state

घरकामाच्या बहाण्याने अरब देशात नेऊन देहविक्रीला लावणारे रॅकेट कार्यरत; भिवंडीतील महिला अडकल्या जाळ्यात - CRIME

ओमन देशात गेल्यापासून या महिलांना एका फार्म हाऊसमधील खोलीत डांबण्यात आले. या खोलीमध्ये विविध देशातून याच पद्धतीने फसवणूक करून आणलेल्या आणखी तीस महिलांना बंदी बनवून त्यांच्याकडून शारीरिक संबंधांचे काम करण्यास भाग पाडत होते.

ठाणे
author img

By

Published : Jul 31, 2019, 11:35 PM IST

ठाणे - परदेशात नोकरी लावण्याचे आकर्षक सर्वांनाच असते. परंतु, बऱ्याच वेळा एजंटमार्फत फसवणुकीचा प्रकार घडत असतानाच भिवंडी शहरातील दोन महिलांना घरकाम करण्याच्या बहाण्याने अरब देशात नेऊन एका खोलीत डांबून त्यांच्याकडून देहविक्री करून घेत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

खळबळजनक बाब म्हणजे यामधील एका पीडित महिलेने तीन महिन्यानंतर स्वतःची सुटका करून घेतली. मात्र, तिच्यासोबत गेलेल्या दुसऱ्या महिलेला गेल्या सहा महिन्यापासून ओमन देशातील एका खोलीमध्ये डांबून तिला मारहाण करत आहेत. त्यामुळे पीडित महिलेच्या कुटुंबीयांनी तिच्या सुटकेसाठी स्थानिक खासदारांमार्फत परराष्ट्र मंत्रालयातून तिला सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तर, दुसरीकडे या प्रकरणातील पीडित महिलेची फसवणूक करणारे एजंट फरार झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी शहरातील अमिना बाग परिसरात नुरजहा (वय 52) या राहतात. त्यांना त्याच परिसरातील एका भामट्या एजंट शौकत अन्सारी व त्याच्या मुलाने तिच्यासह त्याच परिसरातील राहणाऱ्या तीस वर्षीय एका महिलेला दुबईमध्ये घरकाम केल्यास भरपूर पगार मिळेल, असे आमिष दाखवून त्यांच्याकडून प्रत्येकी 50 हजार रुपये घेतले. त्यानंतर त्यांना मुंबईतील एक महिला एजंट शमीम हिच्याकडे टुरिस्ट व्हिसा काढून या दोन्ही महिलांना 28 जानेवारीला दुबईला घरकामासाठी न पाठवता त्यांना ओमन देशात पाठवण्यात आले होते.

ओमन देशात गेल्यापासून या महिलांना एका फार्म हाऊसमधील खोलीत डांबण्यात आले. या खोलीमध्ये विविध देशातून याच पद्धतीने फसवणूक करून आणलेल्या आणखी तीस महिलांना बंदी बनवून त्यांच्याकडून शारीरिक संबंधांचे काम करण्यास भाग पाडत होते. बंदी असलेल्या त्या 30 पीडित महिलांमध्ये भारतातील महाराष्ट्र, हैदराबाद यांच्यासह युगांडा व काही युरोपियन महिला डांबून ठेवल्याची माहिती सुटका झालेल्या पीडित महिलेने दिली. तसेच देहविक्रीच्या कामास नकार देणार्‍या पीडित महिलांना बेदम मारहाण करून त्यांचा शारीरिक छळही करत असल्याची माहिती पीडित महिलेने दिली.

दरम्यान, या नराधमांच्या तावडीतून सुटका झालेल्या पीडित महिलेने अशा कठीण प्रसंगातही तिने मोबाईलवर लपून कुटुंबाशी संपर्क साधला आणि आपल्यावर झालेला प्रसंग सांगितला. हे ऐकूण कुटुंबाला धक्काच बसला. त्यांनी तत्काळ पीडित महिलेला दुबईत पाठवणाऱया एजंट शौकत अन्सारी याच्याशी संपर्क करून पीडित साजिदा हिला भारतात माघारी आणण्यासाठी विनंती केली. यावर एजंट शौकतने कुटुंबाकडून दीड लाख रुपये घेतल्यावर साजिदा शेख या पीडित महिलेची 8 एप्रिलला भारतात परत आणले.

पीडित साजिदा भारतात परत आली. मात्र, तिच्यासोबत गेलेली नूरजहाँ खान ही तेथेच अडकून आहे. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांशी तिचा संपर्कसुद्धा होत नव्हता.

दरम्यान, तीन महिन्यानंतर रात्री दीड वाजताच्या सुमारास अडकून असलेल्या दुसऱया महिलेने मुलगा फिरोज याच्याशी मोबाईलवर संपर्क करून आपली तब्येत बिघडली असून आपल्या जबरदस्तीने कोंडून ठेवल्याचे सांगत सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याची विनवणी केली. आपली आई ओमान देशात अडकून पडली असल्याने तिला सोडवण्यासाठी एजंट शौकत याच्याकडे विनवणी केल्यावर त्याने तिच्या सोडवणुकीसाठी दीड लाख रुपये मागितले. पीडित महिलेच्या कुटुंबियांनी दागिने विकून व काही पैसे व्याजाने घेऊन एजंट शौकत याला दिले. मात्र, रक्कम मिळताच दुसऱ्या दिवशी शौकत अन्सारी व मुंबई येथील महिला एजंट शमीम हे दोघेही भामटे फरार झाले असून दुसऱया महिले पाठोपाठ तिच्या कुटुंबाचीही फसवणूक या भामट्या एजंटच्या जोडगोळीने केली आहे.

त्यानंतर पीडित महिलेचा मुलगा फिरोज याने भिवंडी लोकसभेचे भाजप खासदार कपिल पाटील यांची भेट घेऊन त्यांना आपल्या आईची करून कहाणी सांगितली. त्यानंतर खासदार कपिल पाटील यांनी परराष्ट्र मंत्रालयाशी पत्रव्यवहार करून तिच्या सुटकेचा प्रयत्न करण्याची विनंती केली. त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने सुरुवातीला नूरजहाा ही दुबई येथे नसून ती ओमन देशात असल्याचे कळवले. आता पीडित महिलेच्या मुलाने आपल्या आईची भारत सरकारने लवकरात लवकर ओमन देशातून सुटका करून तिला मायदेशी परत आणावे, अशी मागणी केली आहे.

Intro:किट नंबर 319

Body:घरकामाच्या बहाण्याने अरब देशात नेऊन वाममार्गाला लावणारे रॅकेट कार्यरत; भिवंडीतील महिला अजूनही सुटकेच्या प्रतिक्षेत

ठाणे :- परदेशात नोकरी लावण्याचे आकर्षक सर्वांनाच असते परंतु बऱ्याच वेळा एजंटमार्फत फसवणुकीचा प्रकार घडत असतानाच भिवंडी शहरातील दोन महिलांना घर काम करण्याच्या बहाण्याने अरब देशात नेऊन एका खोलीत डांबून त्यांच्याकडून देहविक्रय करून घेत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
खळबळजनक बाब म्हणजे यामधील एका पीडित महिलेने तीन महिन्यानंतर स्वतःची सुटका करून घेतली, मात्र तिच्यासोबत गेलेल्या दुसऱ्या महिलेला गेल्या सहा महिन्यापासून ओमन देशातील एका खोलीमध्ये खोलीमध्ये डांबून तिला मारहाण करीत तिला वाम मार्गाला लावण्यात आले आहे त्यामुळे पीडित महिलेच्या कुटुंबियांनी तिच्या सुटकेसाठी स्थानिक खासदार मार्फत परराष्ट्र मंत्रालयातून तिच्या सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे तर दुसरीकडे या प्रकरणातील पीडित महिलेची फसवणूक करणारे एजंट फरार झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार भिवंडी शहरातील अमिना बाग परिसरात राहणाऱ्या नुरजहा गुलाब शेख वय 52 या कुटुंबाचा राहतात त्यांना त्याच परिसरातील एका भामट्या एजंट शौकत अन्सारी व त्याचा मुलाने तिच्यासह त्याच परिसरातील राहणाऱ्या तीस वर्षीय साजीदा शेख महिलेला दुबईमध्ये घरकाम केल्यास भरपूर पगार मिळेल असे आमिष दाखवून त्यांच्याकडून प्रत्येकी 50 हजार रुपये घेऊन मुंबईतील एक महिला एजंट शमीम हिच्याकडे टुरिस्ट व्हिसा काढून ह्या दोघी महिलांना 28 जानेवारी रोजी दुबईला घरकामासाठी न पाठवता त्यांना ओमन देशात पाठवण्यात आले होते.
ओमन देशात गेल्यापासून या महिलांना एका फार्म हाऊसमधील खोलीत डांबण्यात आले या खोलीमध्ये विविध देशातून याच पद्धतीने फसवणूक करून आणलेल्या आणखी तीस महिलांना बंदी बनवून त्यांच्याकडून शारीरिक संबंधांचे काम करण्यास भाग पाडत होते. बंदी असलेल्या त्या 30 पीडित महिलांमध्ये भारतातील महाराष्ट्र, हैदराबाद यांच्यासह युगांडा व काही युरोपियन महिला डांबून ठेवल्याची माहिती सुटका झालेल्या पीडित महिलेने दिली. तसेच देहविक्रय कामास नकार देणार्‍या पीडित महिलांना बेदम मारहाण करून त्यांचा शारीरिक छळही करत असल्याची माहितीपीडित महिलेने दिली .
दरम्यान या नराधमांच्या तावडीतून सुटका झालेल्या पीडित महिलेने अशा कठीण प्रसंगातही तिने मोबाईलवर लपून छपून कसाबसा कुटुंबाशी संपर्क साधला आणि आपल्यावर बीतलेला प्रसंग सांगितला हे एकूण कुटुंबाला धक्काच बसला त्यांनी तत्काळ पीडित महिलेला दुबईत पाठवणारा एजंट शौकत अन्सारी याच्याशी संपर्क करून पीडित साजिदा हिला भारतात माघारी आणण्यासाठी विनंती केली , यावर एजंट शौकतने कुटुंबाकडून दीड लाख रुपये घेतल्यावर साजिदा शेख या पीडित महिलेची 8 एप्रिल रोजी भारतात परत आणले.
पीडित साजिदा भारतात परत आली मात्र तिच्यासोबत गेलेली नूरजहाँ खान ही तेथेच अडकून पडली. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांशी तिचा संपर्क सुद्धा होत नव्हता.
दरम्यान तीन महिन्यानंतर रात्री दीड वाजताच्या सुमारास अडकून असलेल्या नूरजहाँ हिने मुलगा फिरोज याच्याशी मोबाईलवर संपर्क करून आपली तब्येत बिघडली असून आपल्या जबरदस्तीने कोंडून ठेवल्याचे सांगत सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याची विनवणी केली. आपली आई ओमान देशात अडकून पडली असल्याने तिला सोडवण्यासाठी एजंट शौकत याच्याकडे विनवणी केल्यावर त्याने तिच्या सोडवणुकीसाठी दीड लाख रुपये मागितले. पीडित महिलेच्या कुटुंबियांनी दागिने विकून व काही पैसे व्याजाने घेऊन एजंट शौकत याला दिले. मात्र रक्कम मिळताच दुसऱ्या दिवशी शौकत अन्सारी व मुंबई येथील महिला एजंट शमीम हे दोघेही भामटे फरार झाले असून नूरजहाँ पाठोपाठ तिच्या कुटुंबाची ही फसवणूक या भामट्या एजंटच्या जोडगोळीने केली आहे.
त्यानंतर पीडित महिलेचा मुलगा फिरोज याने भिवंडी लोकसभेचे भाजपा खासदार कपिल पाटील यांची भेट घेऊन त्यांना आपल्या आईची करून कहाणी कथन केल्यावर खासदार कपिल पाटील यांनी परराष्ट्र मंत्रालयाशी पत्रव्यवहार करून तिच्या सुटकेचा प्रयत्न करण्याची विनंती केली त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने सुरुवातीला नूरजहाँ ही दुबई येथे नसून की ओमन देशात असल्याचे कळविले. आता पीडित महिलेच्या मुलाने आपल्या आईची भारत सरकारने लवकरात लवकर ओमन देशातून सुटका करून तिला मायदेशी परत आणावे अशी मागणी केली आहे.

tfp fid ( 2, bayet, 2 vis)
mh_tha_3_ocein_sex_racket_2_bayet_2_vis_10007

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.