ठाणे : मित्राच्या वाढदिवसाची पिकनिक करण्यासाठी मुंबईतील घाटकोपर परिसरातील चार तरुणांचा बदलापूर नजीकच्या कोंडेश्वर धबधब्याच्या कुंडात बुडून दुर्दैवी मृत्यू ( Four youths drowned waterfall pool ) झाल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ज्या मित्राचा वाढदिवस होता. त्याचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. आकाश राजू झिंगा (वय 19 ) स्वयंम बाबा मांजरेकर (वय 18) सुरज मछिंद्र साळवे (वय 19)लिनस भास्कर पवार( वय 19) असे पाण्यात बुडून मृत्यू ( youth drowned in the pool of Kondeshwar falls ) झालेल्या तरुणांची नावे असून हे सर्वजण मुंबईतील घाटकोपर भागातील कामराज नगर परिसरात राहत होती.
वाढदिसवस बेतला जीवावर - मृतक चारही तरुण मुंबई घाटकोपर भागातील कामराज नगरमध्ये कुटूंबासह राहत होते. मृतक सर्वजण एकत्र महाविद्यालयात शिक्षक घेत होते. आज मृत आकाश याचा वाढदिवस होता. त्यामुळे मृतक सर्वजण पिकनिक करून पोहण्यासाठी कुंडातील पाण्यात उतरले असता खोल पाण्याचा अंदाज न आल्याने ते चारही तरुण बुडाले. स्थानिक गावकऱ्यांना याची माहिती मिळताच गावकऱ्यांनी कुंडातील पाण्यात उड्या घेत या चारही तरुणांना बाहेर काढले. मात्र त्यापूर्वी या चारही तरुणांचा मृत्यू झाला होता.
कोंडेश्वर धबधब्याच्या ठिकाणी मनाई आदेश - पावसाळ्यात कोंडेश्वर धबधब्याच्या ठिकाणी मनाई आदेश लागू होते मात्र तरी देखील हे मनाई आदेश न जुमानता अनेक तरुण या ठिकाणी सहलीसाठी येत होते. स्थानिक गावकरी वारंवार त्यांना विरोध करत असताना देखील हे तरुण कुंडाच्या पाण्यात उतरून आपला जीव धोक्यात घालत होते.सध्या या तरुणाचे मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. तर कुळगाव पोलीस पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करून पुढील तपास पोलीस करत आहेत.
दरम्यान, आज दुपारीही सायन परिसरातून पिकनिकसाठी मित्रांसोबत आलेल्या एका तरुणाचा उल्हास नदीत बुडून मृत्यू झाला. त्याचाही मृतदेह बदलापूर अग्निशमन दलाच्या जवानांनी शोध घेऊन उत्तरणीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात रवाना करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. एकंदरीतच आज एकाच दिवशी पाच तरुणांच्या जीवावर पिकनिक बेतल्याने ते राहत असलेल्या परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.