ठाणे - अज्ञात व्यक्तीकडून एकाचवेळी ४ महागड्या वाहनांची तोडफोड केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. कल्याण पश्चिमेकडील जोशीबाग परिसरात सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
हेही वाचा - ठाणे महापौर मीनाक्षी शिंदे यांना कुख्यात गुंडाकडून धमकीचा फोन
जोशीबाग परिसरातील नागरिकांनी आपली वाहने रस्त्यावरील पार्किंगच्या ठिकाणी पार्क करून ठेवले होते. यातील तीन महागड्या कार आणि एका टेम्पोची अज्ञाताने मध्यरात्रीच तोडफोड केली आहे. ही तोडफोड कोणी आणि कशासाठी केली? याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
हेही वाचा - भरधाव वाहनाने मायलेकीला चिरडले; 6 वर्षीय चिमुकली ठार
दरम्यान, यापूर्वीही आमच्या वाहनांची अशाच प्रकारे तोडफोड झाल्याची माहिती कार मालक संगीता यांनी दिली आहे. महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात नुकसानग्रस्त कार चालकांनी व मालकांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला असून या घटनेचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.
हेही वाचा - गोंदियामध्ये 2 हजाराची लाच घेताना ग्रामसेवक अटकेत