ETV Bharat / state

Fire Outbreak In Thane : मुंब्र्यातील शिवाजीनगर भागात दोन घरांना भीषण आग, 4 जण होरपळले - झगडे चाळीत आग

मुंब्र्यातील शिवाजीनगर भागातील झगडे चाळीत आग लागल्याची घटना घडली आहे. चाळीतील दोन घरांना लागलेल्या आगीत एकूण ४ जण जखमी असून त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Fire outbreak In Thane
दोन घरांना भीषण आग
author img

By

Published : May 22, 2023, 4:23 PM IST

Updated : May 22, 2023, 4:58 PM IST

झगडे चाळीत दोन घरांना भीषण आग

ठाणे: ठाण्यामध्ये राहत्या घरामध्ये आग लागल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंब्र्यातील शिवाजीनगर भागात असणाऱ्या झगडे चाळीत ही घटना घडली आहे. दुपारच्या वेळी चाळीतील दोन घरांना लागलेल्या आगीत एकूण 4 जण भाजले आहेतच. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये एक पुरुष, एक महिला आणि 2 लहान मुलांचाही समावेश आहे.आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग विजवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. तसेच चाळीतील घरे खाली करण्यात आली आहेत.

आग लागण्याच्या घटना: आग लागण्याच्या ठिकाणाहून चाळीच्या वरून जाणारी हाय टेन्शन वायर पडल्याने, सदर आग लागल्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे. मागील काही दिवसात आग लागण्याच्या घटना वाढल्या असून शॉर्ट सर्किट आणि वाढत्या उन्हामुळे आगिंच्या घटकांमध्ये वाढ झाली आहे. या आगीच्या कारणांचा शोध अग्निशामक दलाकडून घेतला जात आहे.

  • #WATCH | Maharashtra | 4 people were severely injured after fire broke out in Thane Shivaji Nagar. Four fire engines rushed to the spot and brought the fire under control. pic.twitter.com/jOQ00AASCI

    — ANI (@ANI) May 22, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

या आधीही अशीच घटना घडली होती: ठाण्यातील भिवंडी परिसरात एका गोदामाला भीषण आग लागली. आग अजूनही सुरूच आहे, सुमारे 6 अग्निशमन दल घटनास्थळी हजर असून आगीवर नियंत्रण मिळवत आहेत. आगीचे सत्र सुरु असून एका केमिकल गोदामाला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली होती. हि घटना भिवंडी तालुक्यातील राहनाळ ग्रामपंचायत हद्दीतील घडली होती. देशमुख कंपाउंड येथे केमिकल गोदामाला लागली होती. या गोदामात घातक रासायनिक साठा साठवला होता. आगीची घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी भिवंडी अग्निशामक दलाच्या २ गाड्या दाखल झाल्या होत्या. तर या भीषण आगीमुळे परिसरात धुराचे मोठे लोट पसरले होते.

हेही वाचा -

  1. Fire outbreak In Bhiwandi भिवंडीत टोलेजंग इमारतीला आग वेळीच मदतकार्याने मनुष्यहानी टळली
  2. 3 Worker Died In Fire मंडपाच्या गोडावूनला लागलेल्या भीषण आगीत तीन कामगार जळून खाक आगीत चार सिलेंडर फुटले
  3. Mobile Phone Exploded In Pocket खिशात मोबाईलचा स्फोट होऊन लागली आग वेळीच आग विझविल्याने वाचले प्राण

Last Updated : May 22, 2023, 4:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.