ठाणे : कल्याण पूर्व येथील चिंचपाडा परिसरात गुरुवारी एका संकुलात शिरलेल्या बिबट्याला १२ तासाच्या अथक प्रयत्नानंतर वन विभाग, प्राणी मित्र संघटनांना बिबट्याला जेरबंद करण्यात यश (Leopard caught up after 12 hours in Kalyan) आले. मात्र या बिबट्याने तीन रहिवाशी आणि एका विशेष वन पथकाच्या कर्मचाऱ्याला जखमी Leopard Attack In Kalyan केले.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव : चिंचपाडा भागातील श्रीराम अनुग्रह रहिवास इमारतीत काल सकाळी ६ वाजता एक बिबट्या शिरकाव केला होता. मलंग गडाच्या जंगलातून इमारतीमध्ये शिरताना बिबट्याने दोन पादचारी आणि श्रीराम अनुग्रह सोसायटीतील एका रहिवाशावर जोरदार हल्ला केला होता. रहिवाशाने आरडाओरड करत बिबट्याच्या तावडीतून सुटका करत घरात पळ काढला. तात्काळ दरवाजा बंद केल्याने ते बचावले. यांनतर रहिवाशांनी एकमेकांनी संपर्क करुन घराबाहेर न पडण्याबाबत सतर्क केले. रहिवाशांनी लागलीच वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. बिबट्या शिरल्याची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न सुरु केले.
सोसायटीसह परिसराला वेढा : इमारतीचा चिंचोळा आवार आणि बघ्यांची झालेली गर्दी यामुळे बिबट्याला पकडण्यात अडचणी येत होत्या. बिबट्या इमारतीच्या आवारातच लपून बसल्याने इमारतीतील रहिवासी सकाळपासूनच दार बंद करून घरातच बसले होते. रहिवाशाने आरडाओरड करत बिबट्याच्या तावडीतून सुटका करत घरात पळ काढला. तात्काळ दरवाजा बंद केल्याने ते बचावले. यांनतर रहिवाशांनी एकमेकांनी संपर्क करुन घराबाहेर न पडण्याबाबत सतर्क केले. रहिवाशांनी लागलीच वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. विभागीय वन अधिकारी संजय चन्ने आणि त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाल्यावर पालिका अग्निशमन दलाचे जवान, पाॅज, वाॅर, सेवा, वफ या प्राणी मित्र संस्था, पोलीस यांनी श्रीराम अनुग्रह सोसायटीसह परिसराला वेढा (Four injured in leopard attack) घातला.
जखमी रहिवाशी : बिबट्या पळून जाणार नाही याची खबरदारी घेतली. जखमी रहिवाशाला रुग्णालयात दाखल करण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतीच्या गच्चीतुन शिडीवरुन खाली उतरविले. हा सर्व थरार बघण्यासाठी बघ्यांची गर्दी जमली होती. नागरिकांच्या आवाजाने बिथरलेल्या बिबट्याने पळण्यासाठी प्रयत्न केले, तो चौथ्या मजल्यावरील जिन्यातून इमारतीच्या मोकळ्या सज्ज्यात उड्या मारण्या व्यतिरिक्त बाहेर पळून जाऊ शकत नव्हता. वनाधिकाऱ्यांनी सोसायटीचे मुख्य प्रवेशव्दार बंद करुन घेतले. वनाधिकारी बिबट्याला इमारतीच्या एका कोपऱ्यात स्थानबध्द करण्यात यश मिळविले होते. बिबट्या इमारतीच्या आतील भागात जिन्यात असल्याने त्याला सापळ्यात अडकविणे शक्य (Leopard caught up) नव्हते.
तिसऱ्या इंजेक्शनमध्ये बिबट्या गारद : स्थानिक वनाधिकाऱ्यांना बिबट्याला जेरबंद करणे शक्य नसल्याने बोरीवली येथून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबट्या बचाव पथकाला दुपारी पाचारण करण्यात आले. या पथकातील नेमबाजांनी स्थानबध्द केलेल्या बिबट्यावर भुलीची इंजेक्शन सोडली. दोन इंजेक्शनच्यावेळी गुरगुरणारा बिबट्या (नर) तिसऱ्या इंजेक्शन मध्ये गारद झाला. तात्काळ जाळ्यात पकडून त्याला वैद्यकीय उपचारासाठी संजय गांधी उद्यानात नेण्यात आले. तो भुकेला असल्याने अधिक आक्रमक होता, असे ‘पाॅज’चे नीलेश भणगे यांनी सांगितले.
भक्ष्याचा शोध : माळशेज घाट, बारवी धरण जंगल परिसरातून बिबट्या मलंगड जंगलात आला असावा. तेथून तो भक्ष्याचा शोध घेत तो कल्याण पूर्वेत आला असण्याचा अंदाज वनाधिकाऱ्यांनी वर्तविला. मागील आठ महिन्यापासून बिबट्याचा ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड, बदलापूर, उल्हासनगर, शहापूर, भिवंडी, पडघा, कसारा, डोळखांब भागात संचार सुरू (Leopard caught up in Kalyan) आहे.
ड्रोन कॅमेऱ्याची मदत : 'पॉज'संस्थे चे निलेश भणगे, देवेंद्र निलाखे, ऋषीकेश सुरसे आणि भूषण पवार यांनी या बिबट्या जेरबंद कारवाईत भाग घेतला. याशिवाय सेवा, वॉर, वफ प्राणिमित्र संस्थां सहभागी झाल्या होत्या. हा बिबट्या या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरच ठाण मांडून बसला होता. मात्र त्याचा नेमका ठावठिकाणा समजत नसल्याने अखेर त्याचे नेमके ठिकाण शोधण्यासाठी वन विभागाकडून ड्रोन कॅमेऱ्याची मदत घेण्यात आली.
बाळाला वाचवण्यासाठी झुंज :श्रीराम अनुग्रह सोसायटीतील रहिवासी राजू पांडे सकाळी साडेआठ वाजता आपल्या सहा दिवसाच्या बाळाला घेऊन कोवळ्या उन्हात इमारतीखाली बसले होते. वडील इमारतीच्या खाली बसल्याचे पाहून बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. एका हाताने अधू असलेल्या राजू पांडे यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या मुलाला आपल्या छातीशी कवटाळून ठेवले व मुलाचे जीव वाचवले. मात्र बिबट्याने त्यांच्या डोक्यावर व पाठीवर आणि खांद्यावर जोरदार हल्ला केला. डोक्यावर 40 टाके पडले. राजू पांडेवर बिबट्या हल्ला करीत होता. त्यावेळी त्यांचा लहान भाऊ पाठून मोठमोठ्याने आरडाओरडा करत बिबट्याच्या दिशेने धावत आला. शिवाय लोकांची गर्दी बघत बिबट्याने इमारती मध्ये धाव घेतली. बिबट्याच्या हल्ल्यात राजू पांडे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उल्हासनगर मधील शिवम रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्यांच्या डोक्यावर 40 टाके पडले आहेत. त्यांचे बाळ सुखरूप असून ते त्याच्या आजी जवळ असल्याची माहिती मनोज पांडे यांनी दिली.
बिबट्या चार वर्षाचा : हा बिबट्या नर जातीचा असून चार वर्षाचा आहे. आता जेरबंद केलेल्या बिबट्याला विशेष वन विभागाच्या पथकाने व्हॅनमध्ये जेरबंद करून त्याला बोरिवली मधील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात नेण्यात येऊन याठिकाणी त्याची तपासणी केली जाणार असल्याची माहिती विशेष वन पथक विभागाच्या अधिकारी गिरीजा देसाई यांनी माहिती दिली.