ETV Bharat / state

बेकायदा औषध निर्मिती प्रकरणी 11 कोटींचा साठा जप्त; औषध प्रशासन विभागाची धडक कारवाई - illegal medicines in thane

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने भिवंडी तालुक्यातील काल्हेर येथील गोदामावर छापा टाकला. यामध्ये 11 कोटींचा बेकादेशीर औषध साठा जप्त केला आहे.

illegal medicines in thane
बेकायदा औषध निर्मिती प्रकरणी 11 कोटींचा साठा जप्त
author img

By

Published : Jan 3, 2020, 10:48 PM IST

ठाणे - अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने भिवंडी तालुक्यातील काल्हेर येथील गोदामावर छापा टाकला. यामध्ये 11 कोटींचा बेकादेशीर औषध साठा जप्त केला आहे.

अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त पल्लवी दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली औषध विभागाचे कोकण सहआयुक्त व्ही.टी. पौनीकर, साहाय्यक आयुक्त एम आर पाटील, औषध निरीक्षक आबासाहेब रासकर यांच्या पथकाने संबंधित कारवाई केली.

काल्हेर येथील पृथ्वी कॉम्पलेक्समध्ये झोएटीक्स इंडिया लि. या गोदामातील औषध साठ्याची तपासणी चालू होती. या ठिकाणी हिमाचल प्रदेशातील ट्रायसीस व्हेंचर्स या उत्पादकाने विना परवाना उत्पादन केलेला विरकॉन एस हे बुरशी व तत्सम ठिकाणी फवारणीसाठी वापरण्यात येणाऱ्या औषधाचा साठा आढळून आला.

जप्त केलेल्या औषधाचे नमुने तपासल्यानंतर संबंधित कंपनीने या औषधाचे उत्पादन बेकायदेशीरपणे केल्याचे स्पष्ट झाले.

अन्न व औषध प्रशासन विभाग कडून गोदामातील 11 कोटी 11 लाख 69 हजार 365 किमतीचा साठा जप्त केला असून, कंपनी विरोधात औषध व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 च्या कलम 18 क चे उल्लंघन केल्या प्रकरणी भिवंडी न्यायालयात खटला भरला आहे. या गुन्ह्यात कायद्यानुसार 3 ते 5 वर्षांपर्यंत शिक्षा व दंडाची तरतूद असल्याची माहिती औषध निरीक्षक आबासाहेब रासकर यांनी दिली आहे.

Intro:kit 319Body:बेकायदा औषध निर्मिती केल्या प्रकरणी 11 कोटींचा साठा जप्त; औषध प्रशासनाची धडक कारवाई

ठाणे : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या ठाणे पथकाने भिवंडी तालुक्यातील काल्हेर येथील गोदामात साठविलेला ११ कोटी रुपयांचा विना परवाना बेकादेशीर तयार कऱण्यात आला औषधचा साठा जप्त केला आहे .

मिळालेल्या माहिती नुसार अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त पल्लवी दराडे यांना भिवंडी तालुक्यातील काल्हेर परिसरात एका गोदामात कोट्यवधी रुपयांचा विना परवाना बनविलेला साठा केल्या असल्या बाबत खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली औषध विभागाचे कोकणसह आयुक्त वि तु पौनीकर, सहाय्यक आयुक्त एम आर पाटील,औषध निरीक्षक आबासाहेब रासकर यांच्या पथकाने काल्हेर येथील पृथ्वी कॉम्पलेक्स येथील Zoetis India Ltd या गोदामातील औषध साठ्याची तपासणी करीत असताना तेथे हिमाचल प्रदेश येथील Trisis Ventures या उत्पादकाने विना परवाना उत्पादन केलेला Virkon S हे Powerful Broad Spectrum Virucidal Disinfectant या बुरशी व तत्सम ठिकाणी फवारणीकरीता वापरण्यात येणा-या औषधाचा साठा आढळून आला .
जप्त केलेल्या औषधाचे नमुने तपासले असता सदर कंपनीने या औषधाचे उत्पादन विना परवाना केले असल्याचे स्पष्ट झाल्याने अन्न व औषध प्रशासन विभाग कडून गोदामातील 11 कोटी11 लाख 69 हजार 365 किमतीचा साठा जप्त केला असून, कंपनी विरोधात औषध व सौन्दर्य प्रसाधने कायदा 1940 च्या कलम 18 [ क ] चे उल्लंघन केल्या प्रकरणी भिवंडी न्यायालयात खटला दाखल केला आहे. विशेष म्हणजे या गुन्ह्यात उक्त कायद्यानुसार 3 ते 5 वर्षांपर्यंत शिक्षा व दंडाची तरतूद असल्याची माहिती औषध निरीक्षक आबासाहेब रासकर यांनी दिली आहे .

Conclusion:bhiwandi
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.