ETV Bharat / state

डोंबिवलीत शॉटसर्किटमुळे लागली आग; संसार उपयोगी साहित्य जळून खाक

नुतन पद्मश्री इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर एका फ्लॅटमध्ये फ्रिजमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागली. या आगीत किचनमधील संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले.

author img

By

Published : May 11, 2019, 10:43 PM IST

Updated : May 11, 2019, 11:31 PM IST

ठाण्यात शॉटसर्किटमुळे लागली आग; संसार उपयोगी साहित्य जळून खाक

ठाणे - डोंबिवलीच्या पेंडसेनगर परिसरातील नुतन पद्मश्री इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर एका फ्लॅटमध्ये फ्रिजमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागली. या आगीत किचनमधील संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले.

ठाण्यात शॉटसर्किटमुळे लागली आग; संसार उपयोगी साहित्य जळून खाक

डोंबिवली पूर्वेतील पेंडसे नगर, येथे नूतन पद्मश्री इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर रूम क्रमांक ११ मध्ये हर्षल बेलवटे हे कुटुंबासह राहतात. त्यांच्या किचनमध्ये असलेल्या फ्रिजमध्ये सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास शॉटसर्किट झाल्याने आग लागली. किचनच्या खिडकीतून मोठ्या प्रमाणात धूर येत असल्याचे पाहून परिसरातील नागरिकांनी अग्निशमन दलाच्या कार्यलयात संपर्क करून घटनेची माहिती दिली.

माहिती मिळताच, कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत तासाभरात आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र या आगीत बेलवटे यांच्या किचनमधील संसार उपयोगी वस्तू जळून खाक झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झालेले नाही.

घरातील फ्रिजमध्ये शॉटसर्किटने लागली आग;  आगीत संसार उपयोगी साहित्य जळून खाक

ठाणे :- एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील घरातील फ्रिजमध्ये शॉटसर्किटने आग लागल्याची घटना समोर आली आहे. हि घटना डोंबिवलीतील पेंडसे नगर परिसरातील नूतन पद्मश्री इमारतीच्या ३ ऱ्या मजल्यावर घडली आहे. मात्र आगीत किचनमधील संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे.

डोंबिवली पूर्वेतील पेंडसे नगर, येथे नूतन पद्मश्री इमारतीच्या ३ ऱ्या मजल्यावर रूम क्र. ११ हर्षल बेलवटे हे कुटुंबासह राहतात. त्यांच्या किचन मधील असलेल्या फ्रिजमध्ये सायंकाळी साडे पाच वाजल्याच्या सुमाराला शॉटसर्किट झाल्याने आग लागली होती. यावेळी किचनच्या खिडकीतून मोठ्या प्रमाणात धूर येत असल्याचे पाहून अग्निशमन दलाच्या कार्यलयात संपर्क करून घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अग्निशमन दलाची १ गाडी घटनास्थळी पोहचून तासाभरात आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र या आगीत बेलवटे यांच्या किचन मधील संसार उपयोगी वस्तू जळून खाक झाल्या असून सुदैवाने कोणी जखमी झाले नाही.    

I’m protected online with Avast Free Antivirus. Get it here — it’s free forever.
Last Updated : May 11, 2019, 11:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.