ठाणे - दोन दुकानांसह एका घराला भीषण आग लागल्याची घटना घडली. ही घटना अंबरनाथ तालुक्यातील डावळपाडा गावात घडली असून आतापर्यत आगीत लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे. घरातील सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही भीषण आग लागली असल्याचे सांगण्यात येत आहे.
आगीच्या घटनेची माहिती मिळताच कल्याण आणि अंबरनाथ अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे जवानांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. आगीचे भीषण स्वरूप पाहून संपूर्ण गावातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. दरम्यान, आगीचे नेमके कारण अध्यापही समजू शकले नसल्याची माहिती अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिली आहे. मात्र, आगीत घरातील संपूर्ण संसारउपयोगी वस्तू जळून खाक झाल्या आहेत. तसेच या आगीची झळ दुकानालाही पोहोचून दुकानातील साहित्य जळून खाक झाले आहे.
हेही वाचा -
बाळाला विष पाजून आईचा आत्महत्येचा प्रयत्न, घटनेला आता धक्कादायक वळण..!
अम्युझमेंट क्षेत्रात भारताचे काम कौतुकास्पद - ॲमेंडा थॉम्सन ओबे