ठाणे - काही महिन्यापूर्वी वर्तकनगर पोलीस ठाण्यात भाजप नगरसेवकाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेसाठी ठाणे न्यायालयात आलेल्या तक्रारदार महिलेच्या बहिणीला ठार मारण्याची धमकी आणि विनयभंग केल्याची दुसरी तक्रार ठाणे नगर पोलीस ठाण्यात भाजप नगरसेवकाविरोधात दाखल करण्यात आली आहे. यामुळे भाजप पुरस्कृत नगरसेवक विलास कांबळे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
हेही वाचा - खेळण्याच्या बहाण्याने नेवून ९० हजारात विक्री केलेले बाळ पुन्हा आईच्या कुशीत
ठाण्यातील पीडित महिला ही बियरबारमध्ये गायिका म्हणून काम करते. वर्तकनगर पोलीस ठाण्यात महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार भाजप नगरसेवक विलास कांबळे याने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार बलात्कार केला. पीडितेच्या तक्रारीवरून वर्तकनगर पोलीस ठाण्यात १ सप्टेंबर २०१९ ला कांबळे आणि त्याच्या दोन सहकाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पीडिता आणि तिची बहीण २३ डिसेंबरला ठाणे न्यायालय परिसरात गेली होती. त्यावेळी कांबळे याने अश्लील वर्तन केले. याचा जाब पीडितेच्या बहिणीने विचारला असता तिला ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याची तक्रार ठाणे नगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
दरम्यान, महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी ३५४-A , ३५४-D, ३२३, ५०४ आणि ५०६(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे नगर पोलीस अधिक तपास करत आहेत.