ठाणे - रस्त्यावर पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या 15 वाहनांची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना उल्हासनगर कॅम्प 4 येथील गुरूद्वार परिसरात घडली. तोडफोड केलेल्या वाहनांमध्ये कार आणि रिक्षा, टेंम्पोचा समावेश आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातारवण पसरले आहे.
हेही वाचा - रस्ता सुरक्षा अभियान : नवी मुंबईत अपघातांमध्ये 38 टक्क्यांनी घट - संजय कुमार
हल्लेखोर जमावाने वाहनांच्या काचा रॉड आणि तलवारीने फोडून वाहनांचे नुकसान केले आहे. घटनेच्या वेळी सर्व हल्लेखोरांनी तोंडाला रुमाल बांधले होते. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी अज्ञात समाजकंटकांच्या जमावाचा शोध सुरु केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगर कॅम्प 4 येथील गुरूद्वार परिसरात 30 ते 40 अज्ञात हल्लेखोरांनी कार आणि रिक्षाची पहाटे अडीच ते 3 वाजण्याच्या सुमारास तोडफोड केली. यामध्ये 9 रिक्षा, टेंम्पो आणि 5 कारची तोडफोड करण्यात आली आहे.
हेही वाचा - स्वच्छ शहराच्या टॉपटेन यादीत समावेश होण्यासाठी केडीएमसीची लगीनघाई !
दरम्यान, या घटनेमुळे 9 रिक्षाचालकांच्या व्यवसायवर परिमाण झाला आहे. काही चालकांनी तर बँकेचे कर्ज काढून रिक्षा व्यवसाय सुरु केला आहे. आता त्यांच्यावर आर्थिक संकट आल्याने रिक्षा चालकांनी आरोपी जमावाचा लवकरात शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. तर या परिसरात पोलिसांची गस्त नसल्याने, असे प्रकार वारंवार घडत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अज्ञात समाजकंटक कोण आहेत? याचा शोध विठ्ठलवाडी पोलीस घेत आहे.