ETV Bharat / state

कोरोनाच्या धास्तीने ठाण्यातील आजीबाईंची शाळेला दांडी

ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील फांगणे गावात ८ मार्च २०१६ ला म्हणजेच जागतिक महिला दिनी वयोवृद्ध महिलांसाठी शाळा काढण्यात आली. परिसरातील अशिक्षित आजीबाईंना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मोतीराम गणपत दलाल ट्रस्टच्या विशेष सहकार्याने योगेंद्र बांगर या शिक्षकाच्या संकल्पनेतून ही अनोखी शाळा उदयास आली.

Fear of corona: senior women goes absent for school in thane
कोरोनाच्या धास्तीने ठाण्यातील आजीबाईंची शाळेला दांडी
author img

By

Published : Mar 17, 2020, 4:52 AM IST

Updated : Mar 17, 2020, 6:06 AM IST

ठाणे : कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता राज्य शासनाने शहरी भागातील शाळांना ३१ मार्चपर्यंत सुट्टी जाहीर केली आहे. मात्र, ग्रामीण भागातील शाळांना यातून वगळण्यात आले आहे. असे असताना, वयोवृद्ध महिलांसाठी ठाणे जिल्ह्यातील फांगणे येथील आजीबाईंच्या शाळेतील वृद्ध महिलांनी कोरोनाच्या धास्तीने शाळेला दांडी मारली आहे.

कोरोनाच्या धास्तीने ठाण्यातील आजीबाईंची शाळेला दांडी

ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील फांगणे गावात ८ मार्च २०१६ ला म्हणजेच जागतिक महिला दिनी वयोवृद्ध महिलांसाठी शाळा काढण्यात आली. परिसरातील अशिक्षित आजीबाईंना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मोतीराम गणपत दलाल ट्रस्टच्या विशेष सहकार्याने योगेंद्र बांगर या शिक्षकाच्या संकल्पनेतून ही अनोखी शाळा उदयास आली. मात्र, वयोवृध्द गटातील व्यक्तींमध्ये कोरोनाचा फैलाव लवकर होतो, असे प्रसारमाध्यमांतील वृत्त वाचल्यानंतर या आजीबाईंनी स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य दिले. आजीबाईंनी शाळेला दांडी मारण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे.

शाळेत ६० ते ९० वयोगटातील २८ ते ३० आजीबाईंनी प्रवेश घेतला असून, या शाळेची नोंद २०१८ मध्ये लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्येही करण्यात आली आहे. त्यामुळे आंतराष्ट्रीय पातळीवर देखील या शाळेची ओळख निर्माण झाली आहे.

Last Updated : Mar 17, 2020, 6:06 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.