ETV Bharat / state

Father Killed Daughter: 'म्हणून' वडिलांनीच केला पोटच्या मुलीचा खून; कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का... - खून प्रकरण

Father Killed Daughter : आपण खून झाल्याच्या घटना रोज ऐकत असतो. कधी प्रेम प्रकरणं, कधी पैसा तर कधी क्षुल्लक कारणांवरून वाद होऊन खून झाल्याच्या घटना घडतात. ठाण्यात देखील अशीच एक घटना घडलीय. चक्क जन्मदात्या वडिलांनीच पोटच्या मुलीची हत्या केलीय. ही घटना का व कशी घडली, ते आपण सविस्तर जाणून घेऊ या.

Father Killed Daughter
वडिलांनीच केला मुलीचा खून
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 25, 2023, 3:34 PM IST

पोलीस अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया

ठाणे Father Killed Daughter : वडिलांनीच पोटच्या 10 वर्षीय अल्पवयीन मुलीचा खून केल्याची घटना समोर आलीय. धक्कादायक बाब म्हणजे खून झालेल्या मुलीला बोलता ऐकता येत नव्हतं. म्हणून वडिलांनी तिचा राहत्या घरातच खून केल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. ही घटना डोंबिवली पूर्व भागातील मानगाव परिसरात असलेल्या एका चाळीत घडलीय. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात वडिलांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. मनोज अग्रहरी (वय ३८) असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे.

आरोपीला दारूचं व्यसन : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी वडील मनोज हा मूळचा उत्तर प्रदेश मधील जौनपूर येथील रहिवासी आहे. तो पत्नी आणि चार मुलींसह डोंबिवली पूर्वेतील मानगाव परिसरात असलेल्या चाळीतील एका भाड्याच्या खोलीत राहतो. चार मुलींपैकी एक 10 वर्षीय मुलगी गतिमंद आहे. तिला बोलता आणि ऐकू येत नाही. तर दोन मुली आईसह मजुरीची कामं करतात. या मृतक मुलींचे वडील मनोज याला दारूचं व्यसन आहे. तो डोंबिवलीत एका किराणा दुकानात कामगार म्हणून काम करतो. आरोपी वडील दारू पिऊन घरी आल्यावर नेहमी पत्नी, दोन मुलींसह गतिमंद मुलीला मारहाण करायचा. (father killed daughter in thane)

मुलगी होती गतिमंद : शिवाय मृतक गतिमंद मुलीचा काही उपयोग नाही. तिला ठार मारावेच, अशी भाषा तो करत असल्याचं तक्रारीत म्हटलंय. यापूर्वीच तर इतर दोन मुलींसह पत्नीलाही गळा दाबून मारण्याचा प्रयत्न आरोपी करीत होता. मात्र मृत गतिमंद मुलीच्या संगोपनाकडं आईचं पूर्ण लक्ष होतं. दुपारच्या वेळेत मुलीकडं लक्ष देणं आवश्यक आहे. म्हणून ती कामावरुन काही वेळासाठी घरी यायची आणि पुन्हा कामावर जायची. त्यातच 24 सप्टेंबर (रविवारी) संध्याकाळच्या सुमारास आरोपी वडील घरी दारू पिऊन आले. त्यानंतर त्यानं दारुच्या नशेत मतिमंद मुलीचा गळा दाबून खून केला. (thane murder news)

खून करून आरोपी पळाला : दुसरीकडे शेजाऱ्यांना हा प्रकार समजला होता. त्यामुळं आरोपी मनोज पत्नी काम करत असलेल्या एमआयडीसीतील कामाच्या ठिकाणी गेला. तेथील कर्मचाऱ्यांना पत्नी लिलावती हिला तातडीनं घरी जाण्यास सांगा. गतिमंद मुलगी मयत झाली आहे, असा निरोप तिला दिला. तेथून आरोपी मनोज पळून गेला. कर्मचाऱ्यांनी मुलीची आई लिलावतीला घडलेला प्रकार सांगितला. तातडीनं ती घरी आली. तेव्हा मुलगी बिछान्यावर निपचित पडली होती.

आरोपीला डोंबिवली परिसरातून अटक : दरम्यान घटनेची माहिती मानपाडा पोलिसांना मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झालं. पंचनामा करत मुलीचा मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात रवाना केला. आरोपीची पत्नी लीलावतीच्या तक्रारीवरून गतिमंद मुलीचा गळा दाबून खून केल्याचा संशय व्यक्त करुन मनोज अग्रहरी विरुध्द मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. फरार आरोपी वडिलांचा शोध सुरू केला असता, त्याला डोंबिवली परिसरातून अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम चोपडा यांनी दिलीय.

हेही वाचा :

  1. Husband Murder Case : पत्नीनेच केला पतीचा खून अन् रचला दरोड्याचा बनाव; पोलिसांनी उलगडले धक्कादायक गुपित
  2. Shirdi Triple Murder : तिहेरी हत्याकांडानं शिर्डी हादरलं; जावयाकडून मेव्हण्यासह पत्नी, आजी सासूची हत्या
  3. Little Girl Rape Case : चॉकलेटच्या बहाण्याने चिमुरडीवर अत्याचार करून हत्या, नराधमाला बेड्या ठोकण्यासाठी पोलिसांनी वापरली 'ही' युक्ती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.