ETV Bharat / state

चुलतीशी प्रेमविवाह केल्याच्या रागातून तरुणावर भररस्त्यात जीवघेणा हल्ला - attack on a young man over a love affair in dombivali

जितेश हा कल्याण तालुक्यातील खोणी गावात राहतो, याच गावात राहणाऱ्या आरोपी कमलेश यांच्या चुलतीशी काही महिन्यापूर्वी प्रेमविवाह केला होता. याच्यातुन काही वादही झाला होता. त्यानंतर (२७ जून रोजी) दुपारच्या सुमारास जितेश हा आपली कार घेऊन खोणी गावाच्या हद्दीत असलेल्या एका सर्व्हिस सेंटरवर वॉश करण्यासाठी गेला होता. हीच संधी साधून आरोपी कमलेश व त्यांच्या दोन साथीदाराने पाठीमागून ढाब्या समोरच येऊन जितेशवर अचानक लाकडी दांडक्याने व पाईप ने जीवघेणा हल्ला करून बेदम मारहाण करून पळून गेले.

fatal attack on a young man over a love affair in dombivali
चुलतीशी प्रेमविवाह केल्याच्या रागातून तरुणावर भररस्त्यात जीवघेणा हल्ला
author img

By

Published : Jun 28, 2022, 3:53 PM IST

ठाणे - आपल्या चुलतीशी प्रेम विवाह केल्याच्या रागातून चुलत सासऱ्यासह तिघांनी तरुणावर भररस्त्यात जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना कल्याण तालुक्यातील खोणी गावातील एका ढाब्या समोर घडली. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात जखमी तरुणाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कमलेश पावशे, असे गुन्हा दाखल झालेल्या चुलत सासऱ्याचे नाव असून त्यांच्यासह केशव संत आणि एका अज्ञात साथीदारावरही गुन्हा दाखल करण्यात आला. जितेश भगवान भोईर (वय २७,) असे हल्ल्यात जखमी तरुणाचे नाव आहे.

लाकडी दांडक्याने व पाईप ने जीवघेणा हल्ला - जितेश हा कल्याण तालुक्यातील खोणी गावात राहतो, याच गावात राहणाऱ्या आरोपी कमलेश यांच्या चुलतीशी काही महिन्यापूर्वी प्रेमविवाह केला होता. याच्यातुन काही वादही झाला होता. त्यानंतर (२७ जून रोजी) दुपारच्या सुमारास जितेश हा आपली कार घेऊन खोणी गावाच्या हद्दीत असलेल्या एका सर्व्हिस सेंटरवर वॉश करण्यासाठी गेला होता. हीच संधी साधून आरोपी कमलेश व त्यांच्या दोन साथीदाराने पाठीमागून ढाब्या समोरच येऊन जितेशवर अचानक लाकडी दांडक्याने व पाईप ने जीवघेणा हल्ला करून बेदम मारहाण करून पळून गेले. या हल्ल्यात जितेशला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलीस उपनिरीक्षक पी. बी. गायकवाड अधिक तपास करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.