ETV Bharat / state

शेतकरी आठवडा बाजार यापुढे पदपथांवर, राज्य सरकारचे मुंबई-ठाण्यासह सर्वच महापालिकांना आदेश - mumbai

शहरातील प्रमुख रस्त्यालगत असलेल्या पदपथांवरील मोकळ्या जागेत आठवडी बाजार भरवण्याचे आदेश सरकारने राज्यातील सर्वच महापालिकांना दिले आहेत.

आठवडी बाजार
author img

By

Published : Jun 1, 2019, 2:04 PM IST

ठाणे - शेतकऱ्यांच्या आठवडा बाजारासाठी यापुढे शहरातील प्रमुख रस्त्यांलगत असलेल्या पदपथांवरील मोकळ्या जागा उपलब्ध करून देण्याचे आदेश सरकारने राज्यातील मुंबई, ठाण्यासह सर्वच महापालिकांना दिले आहेत. शेतकऱ्यांच्या शेतातील सेंद्रीय खताच्या मदतीने पिकवलेला भाजीपाला ग्राहकांना थेट मिळावा आणि दलाली कमी व्हावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारकडून सांगण्यात येत आहे.

आठवडी बाजार

सेंद्रीय खतावर तयार झालेली प्रदूषणविरहित भाजी घेण्यासाठी ग्राहकदेखील थोडे अधिक पैसे मोजण्यास तयार असतात. पण शेतकऱ्यांच्या आठवडा बाजारासाठी जागा उपलब्ध होत नव्हती. मात्र, आता यापुढे हा बाजार शहरातील प्रमुख रस्त्यालगत असलेल्या पदपथांवरील मोकळ्या जागेत भरवण्याचे आदेश सरकारने राज्यातील सर्वच महापालिकांना दिले आहेत. पदपथांवर भरविण्यात आलेल्या आंबा बाजारामुळे ठाण्यात नुकताच मोठा राजकीय वाद झाला होता. त्यानंतर सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे नेहमीच्या फेरीवाल्यांसह या आठवडा बाजारांमुळे पदपथ व्यापले जाण्याची भीती आहे.

यापूर्वी शहरातील मोकळी मैदाने तसेच गृहनिर्माण संस्था किंवा रहिवासी कल्याण संघांच्या आवारात हे बाजार भरवले जावेत, असे सरकारचे आदेश होते. मात्र, नव्या आदेशामुळे पदपथांवरील नागरिकांचा चालण्याचा अधिकारच हिरावून घेतला जाण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरांमधील पदपथ तसेच रस्त्यांच्या कडेला बसणारे बेकायदा फेरीवाले आणि आता बेकायदा बाजार ही तेथील रहिवाशांची डोकेदुखी ठरली आहे. तसेच ठाण्यातील पदपथावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने भरविण्यात आलेल्या आंबा विक्रीमुळे या भागात राजकीय वादंग झाले आणि त्यातून थेट हाणामारीही झाली. ठाण्यातील हा प्रश्न धुमसत असताना राज्य सरकारने नवा आदेश ठाण्यासह सर्व पालिकांसाठी काढला आहे. या नव्या आदेशामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवरील पदपथ यापुढे शेतकरी आठवडा बाजारांसाठी खुले करून देण्याची सक्ती करण्यात आली आहे.

Intro:सरकारचा आदेश राज्यातील मुंबई, ठाण्यासह सर्वच महापालिकांना , शेतकऱ्यांचा आठवडी बाजार यापुढे भरणार पदपथावरBody:
शेतकऱ्यांच्या शेतातील सेंद्रीय खताच्या मदतीने पिकवलेला भाजीपाला ग्राहकांना थेट मिळावा आणि दलाली कमी व्हावी, यासाठी सुरू करण्यात आलेल्या आठवडी बाजार .सेंद्रीय खतावर तयार झालेली प्रदूषणविरहित भाजी घेण्यासाठी ग्राहकदेखील थोडे अधिक पैसे मोजण्यास तयार असतात.पण शेतकऱ्यांच्या आठवडा बाजारासाठी यापुढे शहरातील प्रमुख रस्त्यांलगत असलेल्या पदपथांवरील मोकळ्या जागा उपलब्ध करून देण्याचे आदेश सरकारने राज्यातील मुंबई, ठाण्यासह सर्वच महापालिकांना दिले आहेत. पदपथांवर भरविण्यात आलेल्या आंबा बाजारामुळे ठाण्यात नुकताच मोठा राजकीय वाद झाला होता . त्यानंतर सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे . त्यामुळे नेहमीच्या फेरीवाल्यांसह या आठवडा बाजारांमुळे पदपथ व्यापले जाण्याची भीती आहे .
यापूर्वी शहरातील मोकळी मैदाने तसेच गृहनिर्माण संस्था किंवा रहिवासी कल्याण संघांच्या आवारात हे बाजार भरविले जावेत, असे सरकारचे आदेश होते. मात्र नव्या आदेशामुळे पदपथांवरील नागरिकांचा चालण्याचा अधिकारच हिरावून घेतला जाण्याची चिन्हे आहेत . मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरांमधील पदपथ तसेच रस्त्यांच्या कडेला बसणारे बेकायदा फेरीवाले आणि आता बेकायदा बाजार ही तेथील रहिवाशांची डोकेदुखी ठरली आहे .तसेच ठाण्यातील पदपथावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने भरविण्यात आलेल्या आंबा विक्री मुळे या भागात राजकीय वादंग झाले आणि त्यातून थेट हाणामारीही झाली . ठाण्यातील हा प्रश्न धुमसत असताना राज्य सरकारने नवा आदेश ठाण्यासह सर्व पालिकांसाठी काढला. या नव्या आदेशामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवरील पदपथ यापुढे शेतकरी आठवडा बाजारांसाठी खुले करून देण्याची सक्ती करण्यात आली आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.