ठाणे : एकाद्या चित्रपटाच्या कथेला शोभेल अशी घटना मुंबई - नाशिक महामार्गावर कसारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या असली पोलीस चौकीत समोर आली आहे. या पोलीस चौकीत चक्क नकली पोलिसांचा राबता असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर भलताच व्हायरल झाला असून या नकली पोलिसांकडून वसुली करण्यात येत असल्याची चर्चा या व्हिडिओमुळे समोर आली आहे.
पोलीसमित्र ? शहापूर तालुक्यातील कसारा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील उंबरमाळी पोलिस चौकी आहे. या पोलीस चौकीत तीन जण स्वतःला पोलिस असल्याचे सांगत मुंबई - नाशिक महामार्गावर वाहन चालकांकडून पैसे वसूल करत असल्याचे व्हिडिओ तयार करणार बोलत असल्याचे व्हायरल व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. विशेष म्हणजे हे नकली पोलीस रात्रीच्या सुमारास उंबरमाळी येथील पोलिस चौकीवर काही वाहनचालकांना अडवून पैसे घेत असल्याचा आरोप व्हायरल व्हिडिओमध्ये करण्यात आला.
हा व्हिडीओ वसुलीसाठी वाहन चालकांना त्रास दिल्याने कोण्या तरी वाहनाचालक आणि प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी मोबाईल कॅमेरामध्ये नकली पोलिसांचे चित्रीकरण करून तो व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला. हा व्हिडीओ दोन दिवसापासून सोशल मीडियावर भलताच व्हायरल झाला असून हे नकली पोलीस, पोलीस मित्र असल्याचे त्या व्हिडिओमध्ये सांगत आहेत.
याप्रकरणी कसारा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप गीते यांच्याशी मोबाईलवर वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. तर दुसरीकडे चक्क पोलीस चौकीत बसून वसुली करणाऱ्या त्या तीन जणांवर वरिष्ठ पोलीस अधिकारी कारवाई करीत का? असा सवाल नेटकऱ्यांकडून विचारला जात आहे.