ETV Bharat / state

Fake Indian notes : 8 कोटींच्या बनावट भारतीय नोटा जप्त; 2 जण ताब्यात - Fake Indian notes worth eight crore

ठाण्यात कोटींच्या बनावट भारतीय नोटा जप्त ( Fake Indian notes worth crores seized in Thane ) केल्या आहेत. या कारवाईत 2 जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी सांगितले की, दोन्ही आरोपी बनावट नोटा बाजारात चलनात आणणार ( Accused will circulate fake notes in market ) होते. राम शर्मा वय ५२ आणि राजेंद्र राऊत वय ५५ अशी अटक केलेल्या दोन आरोपींची नावे आहेत.

Fake Indian notes
ठाण्यातून 8 कोटींच्या बनावट भारतीय नोटा जप्त
author img

By

Published : Nov 12, 2022, 3:04 PM IST

Updated : Nov 13, 2022, 2:34 PM IST

ठाणे : शहर गुन्हे शाखा युनिट 5 ने मोठी कामगिरी केली आहे. त्यांनी 8 कोटींच्या बनावट भारतीय नोटा जप्त ( Fake Indian notes worth crores seized in Thane ) केल्या आहेत. या कारवाईत 2 जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी सांगितले की, दोन्ही आरोपी बनावट नोटा बाजारात चलनात आणणार (Accused will circulate fake notes in market ) होते. राम शर्मा वय ५२ आणि राजेंद्र राऊत वय ५५ अशी अटक केलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. ते दोघेही पालघरचे राहणारे आहेत. पोलिसांना तपासादरम्यान आरोपीने 2,000 रुपयांच्या बनावट भारतीय नोटा छापल्याचे आढळून आले. आरोपींकडून तब्ब्ल 400 बंडल जप्त करण्यात आले. या अनुषंगाने अधिकचा तपास पोलीस घेत आहेत. यामागे मोठे रॅकेट असल्याचा पोलिसांचा संशय आहे.

बनावट भारतीय नोटा जप्त

औद्योगिक युनिटमधील संगणकावर छापण्यात आल्या नोटा : गुप्त माहितीच्या आधारे यासंदर्भात पोलिसांनी धडक कारवाई केली. पोलिसांनी शुक्रवारी घोडबंदर रोड परिसरात एका कारमध्ये 2,000 रुपयांच्या बनावट नोटांचे 400 बंडल सापडले आणि दोघांना अटक केली, अशी माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक विकास घोडके यांनी दिली. हे दोघेही पालघरचे रहिवासी आहेत. त्यांनी आम्हाला पालघरमधील एका गोडाऊनमधून बनावट भारतीय चलनी नोट (एफआयसीएन) ची खेप मिळाल्याचे सांगितले. त्यांना ती देणाऱ्या व्यक्तीला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या नोटा एका औद्योगिक युनिटमधील संगणकावर छापण्यात आल्या होत्या. एका आरोपीच्या मालकीचे हे युनीट आहे, असे पोलिसांनी स्पष्ट केले. या प्रकरणी कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या नोटा आल्या कुठून, आरोपींचे नेटवर्क कसे पसरले आहे याची माहिती मिळवण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर यासंबंधितांचा पुढील तपास सुरू आहे, असे घोडके यांनी सांगितले.

तात्काळ टीम तयार करत सापळा रचला : भारतीय चलनातील 2 हजारांच्या ८ कोटी रु. किंमतीच्या बनावट नोटा विक्रीसाठी आलेल्या 2 आरोपींना ठाणे शहर पोलिसांनी अटक केली आहे. राम हरी शर्मा आणि राजेंद्र रघुनाथ राऊत अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सदर प्रकरणाबाबत ठाणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपी पालघरचे रहिवाशी आहेत. शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास ठाणे घोडबंदर रोड गायमुख चौपाटी येथील जी.बी. रोड परिसरात दोन व्यक्ती 2000 रुपयांच्या बनावट छापलेल्या नोटा विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ टीम तयार करत सापळा रचण्यात आला.

8 कोटी रु. किमतीचे एकूण 400 बंडल जप्त : साधारण साडेदहाच्या सुमारास दोन्ही आरोपी एमएच 04 डीबी 5411 या इनोव्हा गाडीतून येताच पोलिसांनी त्यांना शिताफीने ताब्यात घेतले. या दोन आरोपींकडून दोन हजाराच्या वेगवेगळ्या नंबरच्या नोटांचे 8 कोटी रु. किमतीचे एकूण 400 बंडल जप्त करण्यात आले. आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार या बनावट नोटा मदन चौव्हाणच्या मदतीने आरोपी रामहरी शर्मा याच्या पालघरमधील टेक इंडस्ट्रीयल इस्टेटमधल्या गाळ्यात संगणक व प्रिन्टरच्या सहाय्याने छापण्यात आल्या होत्या. सदर प्रकरणाबाबत ठाणे शहर पोलीस अधिक तपास करत आहेत.

Last Updated : Nov 13, 2022, 2:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.