ETV Bharat / state

Aniksha Jaisinghani : अनिक्षाच्या अटकेपूर्वीच अमृता फडणवीसांना ब्लॅकमेल करणार असल्याची पोलिसांकडे आली होती तक्रार; पण ....

ब्लॅकमेलिंग प्रकरणातील आरोपी अनिक्षा जयसिंघानीच्या अटकेपूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करणार असल्याची तक्रार उल्हासनगर पोलिसांकडे आली होती. पण पोलिसांनी त्यावेळी दुर्लक्ष केल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, या प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच पोलिस प्रशासनाने दखल घेत तपासाला सुरूवात केली.

Amruta Fadnavis
अमृता फडणवीस
author img

By

Published : Mar 19, 2023, 7:06 PM IST

ठाणे : अमृता फडणवीस ब्लॅक मेल प्रकरणात महत्वाची माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनाही माझ्याप्रमाणे अनिल जयसिंघानी हा ब्लॅकमेल करणार असल्याची तक्रार एका व्यापाऱ्याने उल्हासनगर पोलीस ठाण्यात केली होती. मात्र, पोलिसांनी या तक्रारीकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. विशेष म्हणजे त्या व्यापाऱ्याने 4 मार्च रोजी तक्रार दाखल केली होती. मात्र, 16 मार्चला मुबंई पोलिसांनी अमृता फडणवीस यांच्या तक्रारीवरून अनिक्षा जयसिंघानीला ब्लॅकमेल प्रकरणी उल्हासनगरमधून अटक केल्यानंतर स्थानिक पोलीस खळबळून जागे होत. व्यापाऱ्याचा जबाब नोंदवित त्या प्रकरणाचा तपास सुरू केला. सुनील ललवानी असे तक्रारदार व्यापाऱ्याचे नाव आहे.

व्यापाऱ्याने आधीच दिली होती तक्रार : तक्रारदार सुनील लालवानी हे उल्हासनगर मधील चोपडा कोर्ट रोडवरील एका इमारतीमध्ये कुटूंबासह राहतात. त्यांचा साडी विक्रीचा व्यवसाय असून त्यांनी ४ मार्च रोजी उल्हासनगर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता. त्या तक्रार अर्जात नमूद केले कि, मला व माझ्या मुलाला ड्रग्स प्रकरणात बुकी अनिल जयसिंघानी अडकवणार आहे. शिवाय देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृत यांनाही ब्लँकमेल करणार असल्याचे तक्रार अर्जात नमूद केले असून यापूर्वीही किशोर केसवानी, दीपू केसवानी, नंद जेठानी यांच्यासह १० व्यापाऱ्यांना ब्लँकमेल करत त्यांच्या नावे विविध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

तक्रारीत काय नमूद केले? : विशेष म्हणजे तक्रारदार सुनील ललवानी यांनी तक्रार अर्जात नमूद केले की, २६ फेब्रुवारी २०२३ रोजी रात्रीच्या सुमारास माझ्या मुलाच्या मोबाईलवर 8010665890 या मोबाईल नंबरवरून वारंवार संपर्क करीत होता. संर्पक करणारा व्यक्ती हा धुळ्यातून बोलत असल्याचे सांगत होता. त्या व्यक्तीने मोबाईलवर संभाषण करताना सांगितले कि, माझी अनिल जयसिंघानी याने ३० लाखाची फसवणूक केली असून आता सुनील ललवानी आणि मुलाला ड्रग्स प्रकरणात अडकवणार आहे. शिवाय अनिल जयसिंघानी हा देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृत यांनाही ब्लँकमेल करणार असल्याचे त्या व्यक्तीने मोबाईल संभाषणात सांगितल्याचे तक्रार अर्जात नमूद केले आहे.

तक्रारदार आणि जयसिंघानी मित्र : तक्रारदार ललवानी आणि बुकी जयसिंघानी एकेकाळी मित्र होते. काही दिवसापूर्वीच बुकी जयसिंघानी याने ललवानी यांच्याकडे ५० हजार रुपयाची मागणी केली होती. मात्र ५० हजार रुपये देण्यास नकार दिल्याने बुकी जयसिंघानी याने ललवानी व मुलाला गुन्ह्यात अडकवणार असल्याचा कट रचल्याचे समजला. दरम्यान, ललवानी यांनी ४ मार्च २०२३ रोजी उल्हासनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन बुकी जयसिंघानी याच्याविरोधात तक्रार अर्ज दाखल केला. मात्र, त्या तक्रारींकडे पोलिसांनी गांभीर्याने पहिले नसल्याचे दिसून आले.

अनिक्षा जयसिंघानी अटकेत : अमृत फडणवीस यांनी अनिक्षा आणि तिचे वडील अनिल जयसिंघानी यांच्या विरोधात मुबंईतील मलबार हिल पोलीस ठाण्यात २० फ्रेबुवारी २०२३ रोजी ब्लॅकमेलचा गुन्हा दाखल केला. दरम्यान, मुंबई पोलिसांनी अनिक्षाचा शोध घेऊन तिला १६ मार्च २०२३ रोजी उल्हासनगर मधील राहत्या घरातून अटक केली. शिवाय काही साहित्यही जप्त केले. त्यानंतर उल्हासनगर पोलिसांनी तक्रारदार ललवानी यांच्या तक्रार अर्जाची तब्बल १२ दिवसांनी दखल घेत त्यांचा जबाब नोंदवून पुढील तपास सुरु केला आहे. विशेष म्हणजे अटक अनिक्षा जयसिंघानी हिच्यावर यापूर्वी पिंपरी चिंचवड मधील एका पोलीस ठाण्यात गुन्ह्याच्या नोंद असल्याचे समोर आले.

अनिलवर अनेक गुन्हे दाखल : ललवानी यांनी तक्रार अर्जात फरार अनिल जयसिंघानी यांच्या विरोधात देशभरात कुठेकुठे गुन्हे दाखल आहे. हेही तक्रार अर्जात नमूद केले असून एकूण १६ गुन्हे असून सर्वात पहिला अपहरणाचा गुन्हा १९८५ साली उल्हासनगर पोलीस ठाण्यात दाखल आहे. तर दुसरा १९८८ साली हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. शिवाय उल्हासनगर शहरातील विविध पोलीस ठाण्यात एकूण ११ गुन्हे तर परराज्यात ५ गुन्हे दाखल आहेत. यापैकी गुजरात मधील अमदाबाद शहारत २ गुन्हे, गोवा १ गुन्हा, राजस्थान १ गुन्हा, आणि आसाम राज्यात १ गुन्हा असे १६ गुन्हे इंटरनॉशनल किक्रेट बुकी अनिल जयसिंघानी उर्फ सुनील सिल्व्हर याच्या विरोधात गुन्हे दाखल असल्याचे अर्जात नमूद केले.

हेही वाचा : Anil Jaisinghani Case : अनिल जयसिंघानी आणि महाविकास आघाडीतील नेत्यांच्या संबंधांची होणार चौकशी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.