ETV Bharat / state

ईटीव्ही भारत इम्पॅक्ट - शौर्य पुरस्कार प्राप्त महिलेच्या उपासमारीची शासनाकडून दखल; मिळाली हंगामी नोकरी

दोन दिवसापूर्वी 'ईटीव्ही भारत'ने प्रकाशित केली होती. याचीच दखल भिवंडीचे उपविभागीय अधिकारी डॉ. मोहन नळदकर यांनी घेतली आहे. या महिलेला तहसील कार्यालय शहापूर येथे तीन महिन्यांच्या हंगामी शिपाई पदावर नियुक्ती करण्यात आली असून नुकताच तिला भिवंडी येथे नियुक्तीपत्र देऊन तिचा सन्मान केला.

ईटीव्ही भारत इम्पॅक्ट
ईटीव्ही भारत इम्पॅक्ट
author img

By

Published : Jun 2, 2021, 8:57 PM IST

Updated : Jun 2, 2021, 9:07 PM IST

ठाणे - शहापूर तालुक्यातील हली बरफ या महिलेच्या आयुष्यात शौर्य पुरस्कार पटकाविल्यानंतरही तिच्या आयुष्यातील अंधार काही संपला नव्हता. लॉकडाऊनमुळे हंगामी स्वरूपात आश्रमशाळेत मिळालेली नोकरी आश्रमशाळा बंद असल्याने तीही बंद झाली. शिधावाटप पत्रिकेची ऑनलाइन नोंद नसल्याने तीन महिने धान्य सुध्दा न मिळाल्याने तिच्यावर उपासमारीची वेळ आली होती. हीच बातमी दोन दिवसापूर्वी 'ईटीव्ही भारत'ने प्रकाशित केली होती. याचीच दखल भिवंडीचे उपविभागीय अधिकारी डॉ. मोहन नळदकर यांनी घेतली आहे. या महिलेला तहसील कार्यालय शहापूर येथे तीन महिन्यांच्या हंगामी शिपाई पदावर नियुक्ती करण्यात आली असून नुकताच तिला भिवंडी येथे नियुक्तीपत्र देऊन तिचा सन्मान केला. त्यासोबतच पुरवठा अधिकारी यांच्याशी चर्चा करून तिच्या शिधापत्रिकेची ऑनलाइन नोंदणी होत नाही. तोपर्यंत तिला ऑफलाइन धान्य देण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी डॉ. मोहन नळदकर यांनी दिले आहेत.

ईटीव्ही भारतने प्रकाशीत केलेली बातमी
ईटीव्ही भारतने प्रकाशित केलेली बातमी

हेही वाचा-ठाण्यातील शौर्य पुरस्कार प्राप्त महिलेवर उपासमारीची वेळ

'ही' आहे हलीची कहाणी

कातकरी या आदिम आदिवासी जमात म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समाजातील हली बरफ हिने १५ वर्षांची असताना जंगलात लाकूडफाटा घेण्यासाठी गेली. त्यावेळी वाघाने केलेल्या हल्ल्यातून आपल्या बहिणीचे प्राण वाचविले होते. त्याचा सन्मान राष्ट्रीय पातळीवर २०१३मध्ये राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देऊन करण्यात आला होता. परंतु त्यानंतर अशिक्षित असलेल्या हलीकडे प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी सतत दुर्लक्ष केल्याने तिला आपल्या आयुष्यासाठी झगडावे लागले. त्यातून तिला अंत्योदय शिधापत्रिका, घरकुल देण्यात आले. तर उदरनिर्वाहासाठी आदिवासी प्रकल्पांतर्गत आश्रमशाळेत शिपाई पदावर हंगामी नेमणूक करून तिला मदत केली होती. परंतु लॉकडाऊनमध्ये आश्रमशाळा मागील एक वर्षांपासून बंद असल्याने तेथील नोकरी तिने गमावली होती. त्यामुळे तिच्यावर पुन्हा एकदा दारिद्र्याचे जीवन जगण्याची वेळ आली होती. यावर उपाय म्हणून तीन महिन्यांची हंगामी नोकरी तिला उपविभागीय अधिकारी डॉ. मोहन नळदकर यांच्या प्रयत्नातून मिळाल्याने हली बरफ हिने समाधान व्यक्त केले आहे. समाजातील प्रत्येक घटकाला मदत करणे हे शासनाचे कर्तव्य असून हली बरफ हिच्या वाट्याला आलेल्या आयुष्याची माहिती कळताच आपण तिला हंगामी नोकरी देण्याचा निर्णय घेतला, असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी डॉ. मोहन नळदकर यांनी दिली आहे.

Last Updated : Jun 2, 2021, 9:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.