ETV Bharat / state

वृद्ध आई-वडिलांना स्वतःच्या घरातून बेदखल करणाऱ्या मुलीसह जावयाला चपराक - भिवंडी

जन्मदात्या आई-वडिलांना त्यांच्याच घरातून बेदखल करणाऱ्या मुलीसह जावयाला जेष्ठ नागरिक निर्वाह न्यायाधिकरण तथा पीठासीन अधिकारी भिवंडीचे उपविभागीय अधिकारी यांनी न्यायालयीन निर्णय होईपर्यंत आई वडिलांना बेदखल न करण्यासोबतच दरमहा चरितार्थासाठी तीन हजार रुपये देण्याचे आदेश दिले आहेत.

वृद्ध आई-वडिल file photo
वृद्ध आई-वडिल file photo
author img

By

Published : Jul 17, 2021, 7:27 PM IST

ठाणे - जन्मदात्या आई-वडिलांना त्यांच्याच घरातून बेदखल करणाऱ्या मुलीसह जावयाला जेष्ठ नागरिक निर्वाह न्यायाधिकरण तथा पीठासीन अधिकारी भिवंडीचे उपविभागीय अधिकारी यांनी न्यायालयीन निर्णय होईपर्यंत आई वडिलांना बेदखल न करण्यासोबतच दरमहा चरितार्थासाठी तीन हजार रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. जेष्ठ नागरिक कायद्याची चपराक बसलेल्या राधा कमलेश जैन असे मुलीचे नाव आहे. तर कमलेश जैन असे जावयाचे नाव आहे. या निर्णयानंतर उपविभागीय अधिकारी डॉ. मोहन नळदकर यांचे वृद्ध माता-पित्यांनी आभार मानले आहे.

आईची फसवणूक करून घर जावयाच्या नावाने

भिवंडीतील ब्राह्मण आळी येथे राहणाऱ्या तक्रारदार वयोवृद्ध विद्या शेखीलाल सरोज त्यांच्या मनोरुग्ण पतीसोबत राहतात. त्यांना तीन मुले व दोन मुली असून या वृद्ध मातापित्यांनी घरकाम करून त्यांच्या जवळच साठविलेले एकूण ५ लाख ३० हजार रुपये देऊन स्वतः साठी २०१६ मध्ये एक घर खरेदी केले होते. यावेळी वयोवृद्ध विद्याच्या राधा नावाच्या मुलीने आई तुला लिहता वाचता येत नाही, तर वडील मनोरुग्ण असून, सुनांसोबत तुझे नेहमी भांडण होत असल्याने फ्लॅट माझ्या नावे कर व त्या ठिकाणी तूच रहा. असे सांगत आईची फसवणूक करून घर स्वतःच्या नावे केले. त्यांनतर ते घर परस्पर पती कमलेश जैन च्या नावे कुलमुखत्यार पत्र बनवून हे घर मुलीने आपल्या पतीच्या म्हणजेच वृद्ध दांपत्याच्या जावयाच्या नावे केले.

घराचा ताबा मिळावा म्हणून वृद्धांना धमकावल्याप्रकरणी गुन्हा

घर नावावर झाल्यानंतर काही दिवसांनी मुलगी राधा व जावई कमलेश यांनी घरात येऊन वृद्ध आईला शिवीगाळ करीत घर खाली करण्याबाबत धमकावले, या बाबत निजमपुरा पोलीस ठाण्यात मुलगी राधा व जावई कमलेशवर गुन्हा दाखल असतानाच मुलीसह जावयाने पुन्हा त्यांना घरातून बेदखल करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर वयोवृद्ध महिलेने जेष्ठ नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे यासाठी जेष्ठ नागरीक निर्वाह न्यायाधिकरण याकडे वयोवृद्ध विद्या आणि त्यांच्या कुटुंबियांना ब्राह्मण आळी येथील घरातुन बेदखल करु नये व निर्वाह भत्ता मंजुर करावा याकरीता आई वडील व ज्येष्ठ नागरीक यांचा चरितार्थ व कल्याणासाठी अधिनियम २००७ चे कलम ५ (३) अन्वये या कार्यालयांत अपील दाखल केलेले होते.

सांभाळसह दरमहा तीन हजार रुपये निर्वाह भत्ता देण्याचे आदेश

या प्रकरणाची सुनावणीवेळी पीठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. मोहन नळदकर यांनी सुनावणी घेऊन दोन्ही बाजू एकूण घेत वृद्ध अर्जदार विद्या व त्यांच्या कुटुंबियांना ब्राह्मण आळी येथील घरातुन दिवाणी न्यायालयातील अंतिम निकाल होईपर्यंत मुलगी व जावई यांना आई वडिलांना त्या घरातून बेदखल करता येणार नाही, त्यासोबतच सर्वोच्च न्यायालयाच्या आईवडिलांच्या पालनपोषणाची जबाबदारी मुलीची सुध्दा आहे, याचा हवाला देत मुलगी व जावई यांनी वृद्ध आईवडिलांना दरमहा तीन हजार रुपये निर्वाह भत्ता देण्याचे आदेश दिले आहेत. उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या या निर्णयाने वृद्ध महिलेने समाधन व्यक्त केले असून वृद्ध माता पित्यांचा सांभाळ न करणाऱ्या मुलांसाठी देखील चांगला धडा मिळाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.