ETV Bharat / state

ईटीव्ही भारत विशेष : भिवंडी अग्निशमन दलाच्या जांबाजांमुळे ढिगाऱ्याखाली अडकलेल्या ८ जणांना जीवनदान

भिंवडी इमारत दुर्घटनेत आतापर्यंत ४१ जणांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. तर २५ जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. गेल्या ६० तासापासून सुरू असलेल्या या बचाव कार्यात भिवंडीच्या अग्निशामक दलातील जवानांनी अथक कामगिरी करत पहिल्याच दिवशी ८ जणांना जीवदान दिले आहे. त्यानंतर एनडीआरएफ पथकाच्या मदतीने पुढील बचाव सुरू होते.

भिवंडी इमारत दुर्घटना
भिवंडी इमारत दुर्घटना
author img

By

Published : Sep 24, 2020, 8:24 AM IST

Updated : Sep 24, 2020, 8:55 AM IST

ठाणे - भिवंडीत सोमवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास पटेल कंपाऊंडमधील जिलानी नावाची इमारत कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत अग्निशमन दलाच्या जांबाज जवानांना ढिगाऱ्याखाली अडकलेल्या ८ जणांचा जीव वाचविण्यात यश आले आहे. विशेष म्हणजे घटनेची माहिती मिळताच सर्वात आधी घटनास्थळी पोहोचून त्यांनी स्थानिकांच्या मदतीने बचावकार्याला सुरुवात केली होती. घटनेच्या ६० तासानंतरही मदतकार्य सुरू असून आतापर्यत ४१ जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. तर २५ जण जखमी आहेत. या दुर्घटनेनंतर भिवंडी अग्निशमन दलाच्या जवानांनी स्थानिकांच्या मदतीने ५० टक्के रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण केल्याची माहिती अग्निशमन दलाचे प्रमुख राजेश पवार यांनी 'ई टीव्ही भारत'ला दिलेल्या विशेष मुलाखातीत दिली.

भिवंडी इमारत दुर्घटना

भिंवडीतील जिलानी नावाची इमारत अचानक कोसळल्याची घटना पहाटे ३ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती भिवंडी अग्निशमन दलाला मिळताच दलाचे प्रमुख राजेश पवार हे १० ते १५ मिनिटात ७ ते ८ जवानांसह घटनास्थळी दाखल झालेे. त्यानंतर त्यांनी क्षणाचाही विलंब न करता स्थानिकांच्या मदतीने बचावकार्यास सुरुवात केली होती.घटनेच्या दिवशी सकाळी ९ ते १० वाजेपर्यत ८ जणांना ढिगाऱ्याखालून जिवंत काढण्यात या पथकाला यश आले होते. तसेच १२ जणांचे मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढल्याची माहितीही भिवंडी अग्निशमन दलाचे प्रमुख पवार यांनी दिली.

विशेष म्हणजे दुर्घटना घडलेल्या ठिकाणी चिंचोळ्या गल्ल्या आणि दाटीवाटीची वस्ती असल्याने मदतकार्यास अडचणी येत होत्या. मात्र सकाळी ९ च्या सुमारास अग्निशमन दलाच्या जोडीला एनडीआरएफचे पथक दाखल झाल्याने मदतकार्यास वेग आला होता. या दोन्ही टीमनेही घटनेच्या पहिल्याच दिवशी दुपारनंतर सुमारे १७ जणांना जखमी अवस्थेत ढिगाऱ्याखाली काढून त्यांना उपचारासाठी दाखल केले होते. मात्र घटनेच्या 60 तास उलटून गेल्यानंतर आतापर्यत ४१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २५ जण जखमी असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

भिवंडीतील आतापर्यंत घडलेली ही सर्वात मोठी दुर्घटना आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा धोकादायक इमारतीसह अनधिकृत उभ्या राहिलेल्या शेकडो इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांच्या जीव धोक्यात असल्याचे या घटनेने स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता तरी पालिका प्रशासनाने वेळीच धोकादायक व अनधिकृत इमारतीवर कारवाई करावी, अशी मागणी या दुर्घटनेनंतर पुढे आले आली आहे.

Last Updated : Sep 24, 2020, 8:55 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.