ETV Bharat / state

सहाय्यक पोलीस निरीक्षक सांगुन फसवणूक करणाऱ्या तोतयाला अटक

सहाय्यक पोलीस निरीक्षक (Dummy Assistant Police Inspector) सांगुन फसवणूक करणाऱ्या तोतयाला अटक. अनेकांना 6 लाखांचा घातला होता गंडा.

Dummy Assistant Police Inspector arrested in thane
सहाय्यक पोलीस निरीक्षक सांगुन फसवणूक करणाऱ्या तोतयाला अटक
author img

By

Published : Nov 19, 2022, 9:40 PM IST

ठाणे: पोलीस वेषात आलेला तोतया सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. एल. जगताप नाव परिधान करून साथीदाराच्या संगनमताने फिर्यादीच्या मोबाईल मधून EXODUS नावाचे बिट कॉईन ॲप मधून 5 लाख 72 हजार 964 रक्कम ट्रान्सफर करून घेऊन गंडा घातल्याची घटना घडली. सदरचा गुन्हा 13 नोव्हेंबर, 2022 रोजी घडला. पोलिसांनी 14 नोव्हेंबर, 2022 रोजी कशेळी गाव, भिवंडी परिसरातून त्याला अटक केली.

असा घातला गंडाः तक्रारदार असलेल्या ध्रुव सुशिलकुमार भारती, वय- १९ वर्षे धंदा- शिक्षण, रा. रू.नं. १४, चाळ नं. १४, महात्मा फुलेनगर, कळवा, जि. ठाणे यांनी कळवा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक 13 नोव्हेंबर 2022 रोजी आरोपी आर एल जगताप सहाय्यक पोलीस निरीक्षक असलेला पोलीस विभागातील वेश परिधान करून फिर्यादी यांच्या ऑटोरिक्षा गणपती पाड्यावर आढळून त्या रिक्षा खाली उतरून फिर्यादीला दमदाटी करीत त्याच्याकडून त्याचा मोबाईल घेण्यात आला. त्यानंतर फिर्यादीच्या मोबाईलला हाताळून आरोपी जगताप यांनी त्यांच्या मोबाईल मधील एक्सोडस या बिटकॉइन ॲप मधून 7669 यूएस डॉलर म्हणजेच भारतीय चलनात 5 लाख 72 हजार 964 रुपये ट्रान्सफर स्वतःच्या खात्यावर करून घेतले आणि फिर्यादीला गंडा घातला.

या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताचं, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कळवा, मनोहर आव्हाड यांनी पोलीस पथकाला सदर गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले. त्यानुसार, पोलीस पथकाने पुण्यातील आरोपी जगताप यांच्या संदर्भात ठोस माहिती मिळवत गुन्ह्यांच्या घटना स्टारच्या आसपास असलेल्या सीसीटीव्हीचा शोध घेऊन आरोपी जगताप वापरत असलेल्या कारचा नंबर मिळवला.

तसेच आरोपीचा मोबाईल क्रमांक मिळवून तांत्रिक तपास करीत पोलीस पथकाने 14 नोव्हेंबर रोजी भिवंडीतून आरोपी आणि तोतया सहाय्यक पोलीस निरीक्षक आर्यन जगताप याला अटक केली. त्याच्याकडून पोलीस पथकाने फसवणूक केलेल्या रकमेपैकी 1 लाख 40 हजार रोख रक्कम बनावट पोलीस गणवेश 1 लाख 7 हजार रुपयाची गुन्ह्यात वापरलेली रेडी गो कंपनीची कार असा तीन लाखाच्या ऐवज हस्तगत केला आहे. सदर प्रकरणी कळवा पोलीस अधिक तपास करीत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.