ठाणे : अजित पवार सत्तेत येणे म्हणजे नक्कीच महाराष्ट्र एक नंबरला होता. (Deputy CM Ajit Pawar) तो अजून भक्कम होईल असे प्रतिपादन अजित पवार यांच्या उपमुख्यमंत्री (Shinde Fadnavis govt) पदाच्या शपथविधीनंतर कपिल पाटील यांनी व्यक्त केले. (Ajit Pawar obstruction in NCP) केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील हे शहापूर तालुक्यातील एका कार्यक्रमाला आले होते. त्यावेळी त्यांनी आज घडलेल्या मोठ्या राजकीय घडामोडीवर मत व्यक्त केले.
मोदी सरकारला राष्ट्रवादीची साथ: महाराष्ट्रात आधीच डबल इंजिन सरकार होते. आता या सरकारला अजित पवार यांच्या रूपात तिसरी शक्ती मिळाल्याने निश्चितपणे महाराष्ट्र अधिक प्रगती करेल, असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केला. तसेच मोदी सरकारला केंद्रात राष्ट्रवादीची साथ मिळेल, अशी अपेक्षाही मंत्री पाटील यांनी व्यक्त केली.
ट्रिपल इंजिन सरकार: आता आमच्याकडे 1 मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री आहेत. डबल इंजिनचे सरकार आता ट्रिपल इंजिन बनले आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी मी अजित पवार आणि त्यांच्या नेत्यांचे स्वागत करतो. अजित पवारांच्या अनुभवामुळे महाराष्ट्र मजबूत होण्यास मदत होईल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
अजित पवारांचे बंड: अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करून महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवून आणला. तसेच शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर आता पत्रकार परिषद घेत यावर आपली भूमिका स्पष्ट केली.
नऊ आमदारांनी घेतली शपथ: अजित पवार यांच्यासह नऊ आमदारांनी मंत्रिपदाशी शपथ घेतली आहे. त्यांना कोणती मंत्रिपदे मिळणार? याची चर्चा सुरु झाली आहे. अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपदासह जलसंपदा हे खाते असेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नऊ वरिष्ठ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, अदिती तटकरे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
हेही वाचा: