ETV Bharat / state

व्याजाचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना कोट्यवधीचा गंडा, फरार ठकास उत्तर भारतातून अटक - उत्तर प्रदेश

शेअर बाजारात पैसै गुंतवणूक करुन सात ते आठ टक्के दराने व्याज देतो, असे आमिष दाखवून अनेकांकडून लाखोंची रक्कम घेऊन पसार झालेल्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. चंकेश जैन (25) असे या आरोपीचे नाव आहे. त्याने आतापर्यंत एक कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.

thane
thane
author img

By

Published : Aug 11, 2021, 9:01 PM IST

ठाणे - शेअर बाजारात पैसै गुंतवणूक करुन सात ते आठ टक्के दराने व्याज देतो, असे आमिष दाखवून अनेकांकडून लाखोंची रक्कम घेऊन पसार झालेल्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. डोंबिवलीच्या टिळकनगर पोलिसांनी उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथून संबंधित आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. चंकेश जैन (25) असे या आरोपीचे नाव आहे. त्याने आतापर्यंत एक कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.

शेअर बाजारात 8 ते 10 टक्के व्याजाचे आमिष

आरोपी चंकेश जैन हा डोंबिवली पूर्वेकडील बालाजी मंदीर रोडला असलेल्या एका चाळीत राहतो. त्याने अनेक जणांना मी शेअर बाजारात गुंतवणूक करतो, तुमचे पैसे शेअर बाजारात गुंतवा. मी तुम्हाला 8 ते 10 टक्के व्याजाने पैसे परत करतो, असे आमिष दाखवले. बक्कळ व्याजाच्या आमिषाला भुलून अनेकांनी चंकेशला पैसे दिले. गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्याने सुरुवातीला काही जणांना मोबदलाही दिला. त्यामुळे अनेक जणांनी त्याच्याकडे गुंतवणूक केली. त्यानंतर मात्र तो डोंबिवलीतून अचानक बेपत्ता झाला.

मोबाईल लोकेशनच्या आधारे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

आरोपी चंकेश डोंबिवलीतून फरार झाल्याने त्याचा फोन लागत नव्हता. त्याने दिलेल्या पत्त्यावर देखील तो राहत नव्हता. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने गुंतवणूकदारांनी या प्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. मात्र, पोलिसांच्या हातात काहीच सुगावा नव्हता. बेपत्ता चंकेशला शोधण्यासाठी टिळकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव चुंबळे यांनी फौजदार नवनाथ वाघमोडे, पोना संदीप खाडे आणि अशोक करमोडा यांचे पथक नेमले. यादरम्यान पोलीसांना चंकेशचा मोबाईल नंबर मिळाला. या नंबरच्या आधारे तपास करत उत्तर प्रदेशातील गाजियाबाद येथे लपून बसलेल्या चंकेशला अटक केली.

आणखी किती गुंतवणूकदारांना फसविले

आरोपीला कल्याण न्यायालयात हजर केले. त्याला 14 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आतापर्यंत एक कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. त्याने आणखी किती गुंतवणूकदारांना फसविले आहे, याचा शोध टिळकनगर पोलीस घेत आहेत.

हेही वाचा - अरुण गवळीला २८ दिवसांचा पॅरोल मंजूर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.