ठाणे Diwali Festival २०२३ : दिवाळी सण (Thane Diwali Festival) म्हटलं तर मातीच्या पणत्यांना मोठी मागणी असते. तरी पारंपरिक पद्धतीने जिल्ह्यात तयार होणाऱ्या पणत्या बनवण्यासाठी लागणाऱ्या भट्टया काळाच्या युगात पडद्याआड झाल्याने विक्रेत्यांनाच नव्हे तर कुंभारांना देखील या पणत्या गुजरातमधून विकत घ्याव्या लागत आहेत. त्यामुळे यंदाची दिवाळीही गुजरातच्या पणत्यांनेच उजळणार असल्याचं दिसून येत आहे.
काळाच्या युगात भट्टया गायब : पणत्या, मडकी यासारख्या मातीच्या वस्तू काळ्या मातीपासून बनवून त्या भट्टीत भाजून तयार कराव्या लगतात. मात्र, जिल्ह्यातील पणती तयार करणाऱ्या भट्टया बांधकाम विकासाच्या गराड्यात गायब होत नामशेष झाल्या आहेत. भट्टया पेटविण्यासाठी जागा राहिलेली नसून, मोकळ्या जागेवर भट्टी पेटवल्यास त्यातून निघणाऱ्या धूरांमुळे प्रदूषण होत असल्यानं या भट्टया बंद कराव्या लागल्या आहेत.
यंदाही बाजारात उपलब्ध असलेल्या पणत्या या थेट गुजरातमधून आणल्या जात आहेत. या पणत्या ३ रुपयाने खरेदी कराव्या लागतात. मात्र, ५ रुपयांनी या पणत्या कोणीही ग्राहक घेण्यास धजावत नसल्यानं किती माल खरेदी करायचा हा प्रश्न पडतो. तसेच पारंपरिक छोट्या मातीच्या पणत्या (टिवल्या) या केवळ चाकावर तयार करून भट्टीवर भाजल्या जात असत. मात्र, भट्टी बंद झाल्याने टिवल्या बाजारातून गायब झाल्या आहेत - मंगेश तूपगांवकर, मातीकाम व्यावसायिक
गुजरातमधून पणत्यांची आयात : ठाणे जिल्ह्यातील कल्याणात भगवा तलावाजवळ असलेली एकमेव भट्टी आजही सुरू आहे. तरी या भट्टीत तयार होणाऱया पणत्या मागणीप्रमाणे पुरेशा नसल्यानं ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी गुजरातमधून पणत्यांची आयात करावी लागत असल्याचं विक्रेत्यांनी संगितलं. तसेच दिवाळीत छोट्या चुली आणि दळण दळण्याच्या जात्याची देखील पूजा केली जाते. या वस्तू देखील पूर्वी काळ्या मातीपासून तयार केल्या जात असतं, मात्र, आता भट्टी नसल्यानं या वस्तू मातीऐवजी पीओपीपासून तयार केल्या जाऊ लागल्या आहेत. मात्र, पीओपी घातक आहे हे माहीत असले तरी, दुसरा पर्याय नसल्याचं विक्रेत्यांनी सांगितलं.
हेही वाचा -
- Tuberculosis Test : मिठाईच्या दुकानात कर्मचाऱ्यांची होणार क्षयरोगाची चाचणी; अभिनव संकल्पनेला ठाण्यातून सुरुवात
- Diwali Festival २०२३ : सणासुदीत गृहिणींचं बजेट कोलमडणार; डाळी व कडधान्यांच्या भावात प्रतिकिलो १० ते १५ रुपयांनी वाढ
- Diwali Festival २०२३ : सिंगापुरमधील आदिवासींची दिवाळी झाली संस्मरणीय; पाहा व्हिडिओ