ठाणे - यूट्यूबवरील माध्यमावर वादग्रस्त विधान करून मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखवल्या आहेत. याविरोधात रजा अकॅडमीचे सदस्य वकास अहमद सगीर अहमद मलिक (४०) यांनी भाजपच्या दिल्लीतील महिला प्रवक्त्यावर भिवंडीतील शहर पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नुपूर शर्मा असे गुन्हा दाखल झालेल्या भाजप महिला प्रवक्ताचे नाव आहे.
मुंबईनंतर भिवंडीतही गुन्हा दाखल - भाजप प्रवक्ता शर्मा यांनी २७ मे रोजी यूट्यूबवर माध्यमावर मुस्लिम धर्मियांचा पवित्र ग्रंथ व श्रद्धास्थान कुरान आणि अल्लाहचे नबी मोहम्मद पैगंबर व त्यांची पत्नी हजरत आयेशा यांच्यावर आक्षेपाहार्य विधान केले होते. त्यामुळे त्यांच्यावर प्रथम रजा अकॅडमीचे मुंबई प्रमुख सईद नुरी ह्यांनी मुंबई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तर सोमवारी रजा अकॅडमीचे भिवंडीतील सदस्य वकास मलिक यांनी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
भाजप प्रवक्ताच्या अटकेसाठी मागणी - संस्थेचे भिवंडी प्रमुख सलगीर रजा यांच्याशी संपर्क केला. त्यांनी या विषयावर भिवंडीतील म्हाडा कॉलनीतील दारुल उलूम हस्तमतूर रजा मदरसेत बैठक घेण्यात आल्याचे सांगितले. या बैठकीत रजा अकॅडमीचे मुंबई प्रमुख सईद नुरी उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी गुन्हा दाखल केल्याबद्दल पोलीस ठाण्यांचे आभार मानत भाजप प्रवक्ता नुपूर शर्मा हिच्या अटकेसाठी मागणी करणार असल्याचे सांगितले.