ETV Bharat / state

व्यापाऱ्याने उल्हास नदीत फेकल्या मृत कोंबड्या; पुरानंतर नद्यांना प्रदूषणाचा विळखा

author img

By

Published : Aug 18, 2019, 11:09 PM IST

जिल्ह्यातील नद्या आधीपासून प्रदूषित असताना पुरात वाहून आलेल्या हजारो टन कचऱ्याची भर पडल्याने 9 नद्यांच्या जल प्रदूषणात वाढ झाली आहे. यातच मृत कोंबड्या नदीत फेकण्याचा प्रकार घडल्याने स्थानिक जिल्हा प्रशासन तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

मृत कोंबड्या नदीत फेकण्याचा प्रकार घडल्याने स्थानिक जिल्हा प्रशासन तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

ठाणे - जिल्ह्यातील नद्या आधीपासून प्रदूषित असताना पुरात वाहून आलेल्या हजारो टन कचऱ्याची भर पडल्याने 9 नद्यांच्या जल प्रदूषणात वाढ झाली आहे.

यातच मृत कोंबड्या नदीत फेकण्याचा प्रकार घडला आहे. बदलापूर पश्चिम भागात 4 ऑगस्टला पूर आला होता. पूर ओसरल्यानंतर बदलापूर परिसरातील एका कोंबडी व्यापाऱ्याने कोंबड्यांनी भरलेले दोन टेम्पो शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या किनारी लावून त्यामधील शेकडो मृत कोंबड्या नदीच्या वाहत्या पाण्यात टाकल्या. या मृत कोंबड्या नदीत फेकतानाचे चित्रीकरण एका नागरिकाने केले. यानंतर संबंधित व्यक्ती व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.

मृत कोंबड्या नदीत फेकण्याचा प्रकार घडल्याने स्थानिक जिल्हा प्रशासन तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

काही दिवसांपूर्वी दोन ग्रामपंचायतींच्या घंटागाड्यांमधून नद्यांना आलेल्या पुरात कचरा टाकल्याचा प्रकार घडला होता. या दोन्ही घटनांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणाची दखल घेऊन, ठाणे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता बी. बी. नेमाणे यांनी भिवंडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तसेच ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यशवंत म्हापसे यांसह घंटागाडी चालक सुनील चन्ने व सफाई कर्मचारी समीर जाधव यांना निलंबीत केले होते. मात्र, यानंतर दुसऱ्याच दिवशी अंबरनाथ तालुक्यातील वांगणी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कचरा उचलणाऱ्या घंटागाडी चालकानेही नदीपात्रात कचरा फेकण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर आला.

दुसऱ्या ग्रामपंचायतीमधील तसेच मेलेल्या कोंबड्या नदीत फेकणार्‍यांविरोधात अद्यापही कारवाई करण्यात आली नसल्याने स्थानिक जिल्हा प्रशासन तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Intro:319

Body:महापुरात आदी फेकला नद्यांमध्ये घंटागाडी मधून कचरा, तर आता चक्क शेकडो मेलेल्या कोंबड्या

ठाणे :- जिल्ह्यामधील नद्यांना आधीच प्रदूषणाचा विळखा पडला असताना त्यात महापुरात वाहून आलेल्या हजारो टन कचऱ्याची भर पडल्याने जिल्ह्यातील 9 नद्यां जल प्रदूषणाच्या विळख्यात सापडल्या , त्यानंतर मात्र हद्द झाली चक्क दोन ग्रामपंचायतीच्या घंटागाड्या मधून कचरा भरून तो कचरा नद्यांना आलेल्या पुरात टाकल्याचा प्रकार पूर ओसरल्यानंतर घडला होता, या दोन्ही घटनांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने या मधील एका ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकासह दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले, मात्र दुसऱ्या ग्रामपंचायत आणि मेलेल्या कोंबड्या नदीत फेकणार्‍या विरोधात अद्यापही कारवाई करण्यात आली नसल्याने स्थानिक प्रशासन व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे,

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसला होता , त्यामुळे नदी-नाल्यांसह खाडीला पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती, याचाच फायदा घेत भिवंडी तालुक्यातील शेलार ग्रामपंचायत हद्दीमध्ये कचरा उचलणाऱ्या घंटागाडी वरील कर्मचाऱ्याने 2 ऑगस्ट रोजी घंटागाडी कचरा थेट कामवारी नदीच्या वाहत्या पाण्यात टाकला होता, त्यावेळी कचरा टाकतानाचा व्हिडीओ समाज माध्यमावर चांगलाच व्हायरल झाला होता, या व्हायरल व्हिडिओने शेलार ग्रामपंचायतचा स्वच्छ भारत अभियानाचा भोंगळ कारभार जनतेसमोर आणला होता, यामुळे कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणाची दखल घेत ठाणे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता बी. बी. नेमाणे यांनी घेतली होती, त्यामुळे भिवंडी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी शेलार ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यशवंत म्हापसे आणि घंटागाडी चालक सुनील चन्ने व सफाई कर्मचारी समीर जाधव यांना दोषी ठरवून त्यांना निलंबित करण्यात आले, मात्र त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अंबरनाथ तालुक्यातील वांगणी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कचरा उचलणाऱ्या घंटागाडी चालकानेही नदीच्या वाहत्या पात्रात घंटा गाडीतून भरलेला कचरा पाण्यात फेकण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, आता त्यापाठोपाठ कालच मृत कोंबड्या नदीत फेकण्याचा व्हिडिओ समोर आला आहे, हा व्हिडीओ सध्या समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे, बदलापूर पश्चिम भागात 4 ऑगस्ट रोजी महापूर आला होता, त्यानंतर तीन दिवसात पूर ओसरल्यानंतर बदलापूर परिसरात राहणाऱ्या एका कोंबडी व्यापाऱ्याने कोंबड्यांनी भरलेले दोन टेम्पो बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या किनारी लावून त्यामधील शेकडो मृत्त्त कोंबड्या नदीच्या वाहत्या पात्रात फेकल्या , ह्या मृत कोंबड्या नदीत फेकतानाचे चित्रीकरण एका जागरूक नागरिकाने करून तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला,

दरम्यान शेलार ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकासह दोन कर्मचाऱ्यांना नदीत कचरा टाकणे त्यांना भोवल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली, मात्र वांगणी ग्रामपंचायत आणि शेकडो मृतक कोंबड्या नदीत फेकणाऱ्या वर स्थानिक प्रशासन व प्रदूषण नियंत्रण मंडळ हे दोन्ही व्हायरल व्हिडिओ पाहून त्यांच्यावर कारवाई करतील का ? असा प्रश्न पर्यावरणवादी नागरिक करीत आहे,
ftp fid ( 3 vidio)
mh_tha_1_river_ garbage_3_vis _mh_10007

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.