ETV Bharat / state

ठाण्यामध्ये एकाचा कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, ३ वर्षांपूर्वी मुलांसह पत्नी गेली सोडून - लोकनगरी

तीन दिवसांपासून त्यांचा दरवाजा बंद होता. दुर्गंधी सुटल्याने नागरिकांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी दरवाजा तोडून आत पाहिले तर कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह सापडला. त्यातून अळ्या, किडे निघत होते.

प्रातिनिधीक छायाचित्र
प्रातिनिधीक छायाचित्र
author img

By

Published : Feb 3, 2020, 9:36 AM IST

ठाणे - पत्नी व मुले सोडून गेलेल्या पतीचा राहत्या घरातच मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना अंबरनाथ पूर्व येथील काशी लोकनगरी परिसरात घडली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद दाखल करण्यात आली आहे. संदीप नवले (वय 42 वर्षे), असे मृत पतीचे नाव आहे.

अंबरनाथ पूर्व येथील काशी लोकनगरी परिसरात मृत संदीप नवले राहत होते. 3 वर्षांपूर्वी मृत संदीप याची पत्नी व मुले त्याला सोडून गेल्यामुळे तो त्या ठिकाणी एकटाच राहत होता. गेल्या 3 दिवसांपासून संदीप याच्या घराचा दरवाजा बंद होता. त्या घरातून मोठया प्रमाणात दुर्गंधी येत असल्याने इमारतीमधील नागरिकांनी याबाबत शिवाजीनगर पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल होवून पोलिसांनी घराचा दरवाजा तोडून आत पाहणी केली असता संदीप याचा अत्यंत सडलेल्या अवस्थेत मृतदेह घरात पडलेला होता. त्यातून मोठ्या प्रमाणात किडेही बाहेर आलेले होते. संदीप याला दारूचे व्यसन होते. शारिरीक आजारामुळे त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

हेही वाचा - लघुशंकेसाठी उतरलेल्या बाप-लेकीचा रेल्वेच्या धडकेत जागीच मृत्यू

दरम्यान, संदीपचा मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. डॉक्टरांच्या वैद्यकीय अहवालानंतर त्याच्या मृत्यूचे नेमके कारण पोलिसांना समजणार आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद दाखल करण्यात आली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करत आहेत.

हेही वाचा - लग्नाच्या आमिषाने रिक्षाचालकाचा तरुणीवर अत्याचार, पीडिता दोन महिन्याची गर्भवती

Intro:kit 319Body:पत्नी व मुले सोडून गेलेल्या पतीचा घरातच मृतदेह आढळून आल्याने खळबळ

ठाणे : पत्नी व मुले सोडून गेलेल्या पतीचा राहत्या घरातच मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हि घटना अंबरनाथ पुर्व येथील काशी लोकनगरी परिसरात घडली आहे, याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अकस्मत मृत्यूची नोंद दाखल करण्यात आली आहे. संदीप नवले (४२) असे मृतक पतीचे नाव आहे.

अंबरनाथ पुर्व येथील काशी लोकनगरी परिसरात मृतक संदीप नवले राहत होते. ३ वर्षापूर्वी मृत संदीप याची पत्नी व मुले त्याला सोडून गेल्यामुळे तो त्या ठिकाणी एकटाच राहत होता. गेल्या ३ दिवसापासून संदीप याच्या घराचा दरवाजा बंद होता. त्या घरातून मोठया प्रमाणात दुर्घंधी येत असल्याने इमारतीमधील नागरीकांनी याबाबत शिवाजीनगर पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल होवून पोलिसांनी घराचा दरवाजा तोडून आत पाहणी केली असता संदीप याचा अत्यंत सडलेल्या अवस्थेत मृतदेह घरात पडलेला होता. त्यातून मोठया प्रमाणात किडेही बाहेर आलेले होते. संदीप याला दारू पिण्याचे व्यसन होते. शारिरीक आजारामुळे त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
दरम्यान, संदीप यांचा मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी उल्हासनगरातील मध्यवर्ती रूग्णालयात पाठवण्यात आला आहे. डॉक्टरांच्या वैद्यकीय अहवालानंतर त्याच्या मृत्युचे नेमके कारण पोलिसांना समजणार आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अकस्मत मृत्यूची नोंद दाखल करण्यात आली असून अधिक तपास पो.उप.नि.पाटील करीत आहेत.

Conclusion:shivajinagr
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.