ठाणे - Dahi Handi 2023 : ग्लोबल दहीहंडीचे माहेरघर समजले जाणाऱ्या ठाण्यात येत्या ७ सप्टेंबरला दहीहंडीचा थरार पाहायला मिळणार आहे. त्यासाठी कोट्यवधींच्या बक्षीसांची खैरात देखील होणार आहे. यावर्षीच्या दहीहंडीला (Dahi Handi festival) मात्र निवडणुकांचे वर्ष आल्याने राजकीय दृष्ट्या महत्व आले आहे. यावर्षी या खेळाच्या आयोजनामध्ये सर्वच पक्ष अग्रेसर असले तरी या खेळाच्या निमित्ताने आपापल्या पद्धतीने सर्वच पक्ष राजकारण करताना दिसत आहेत. कुठे निष्ठेची तर कुठे प्रेमाची हंडी फुटणार आहे. अशा प्रकारच्या विविध हंड्या ठाण्यात पाहायला मिळणार आहेत.
यंदा ५८४ हंड्या फोडल्या जाणार : दहीहंडीचा सण (Dahi Handi) जवळ आला की, बाळगोपालांमध्ये एक नवचैतन्य संचारते. महिना दोन महिने थर लावण्याचा सराव सुरु असतो व दहीहंडीच्या दिवशी त्यांच्या तयारीचा कस लागतो. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांनी ठाण्यात सुरु केलेल्या टेंबीनाक्यावरील दहीहंडीच्या सणाला खऱ्या अर्थाने ग्लोबल इव्हेंट करण्याचा मान मात्र ठाण्यातील नेत्यांनी पटकावला आहे. ठाण्यात यावर्षी तब्बल ५८४ हंड्या फोडल्या जाणार आहेत. त्यातून पुरुष आणि महिला दहीहंडी मंडळांना कोट्यवधींची बक्षीसांचा पाऊस पडणार आहे. जसा बाळगोपालांमध्ये उत्साह असतो तसाच उत्साह आयोजकांमध्ये देखील पाहायला मिळतो. (Thane Dahi Handi )
ठाण्यातील वर्तकनगर महापालिका शाळेच्या मैदानावर दहीहंडी उत्सवाचे दरवर्षीप्रमाणे आयोजन करण्यात आले आहे. यंदा नऊ थरांचा विश्वविक्रम मोडून १० थरांचा नवीन विक्रम रचणाऱ्या गोविंदा पथकाला तब्बल २१ लाखांचे बक्षीस देणार - प्रताप सरनाईक, आमदार
सर्वच राजकीय पक्षाची हंडी : ठाण्यातील जवळपास सर्वच मोठे दहीहांडी आयोजक हे राजकीय नेते असल्याने, त्यांच्यातील वैयक्तिक मतभेद हे या उत्सवातील आयोजनात देखील दिसतात. राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता व आगामी वर्ष हे निवडणुकांचे वर्ष असल्याने यावर्षीच्या दहीहंडी उत्सवात राजकीय कलगीतुरा पाहायला मिळेल यात शंकाच नाही. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) खासदार राजन विचारे (Rajan Vichare) यांनी ठाण्यातील चिंतामणी चौकातील दहीहंडीला यावर्षी 'निष्ठेची दहीहंडी' असे स्वरूप दिले. यांची जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. तर दुसरीकडे टेंबीनाका येथील दहीहंडीत तोच थरार आणि उत्साह पहायला मिळणार आहे. या दहीहंडीत लाखोंच्या बक्षीसांचा वर्षाव होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
सरनाईक देणार २१ लाखांचे बक्षीस : वर्तकनगर येथील महापालिका शाळेच्या मैदानावर नऊ थरापेक्षा अधिक थर लावणाऱ्या गोविंदा पथकांना २१ लाखांचे बक्षिस (Reward of 21 lakhs Announced) प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्यावतीने जाहीर करण्यात आले आहे. दुसरीकडे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपली दहीहंडी बंद केल्यापासून गोविंदाच्या मदतीसाठी प्रथमोपचार किटचे वाटप केले. या किटमध्ये रेलिस्प्रे, पेन किलर गोळ्या व विविध बँडेज आहेत. तर रवींद्र फाटक (Ravindra Phatak) यांच्या मंडळामध्ये सिने अभिनेत्याची रेलचेल असणार आहे.
हेही वाचा -