ETV Bharat / state

ठाण्यात रमजाननिमित्त खरेदीसाठी नागरिकांची तोबा गर्दी; कोरोना नियमांचे उल्लंघन - thane latest news

रमजानच्या पार्श्वभूमीवर मुंब्रा येथे प्रचंड गर्दी बघायला मिळाली, रस्त्यावरील गर्दीमुळे वाहनांना जायला देखील जागा नव्हती. रमजान नंतर येणारी ही ईद मुस्लिम बांधवांसाठी मोठा सण मानला जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री मुंब्रा इथल्या बाजारात होते. यावेळी अमृतनगर ते कौसा पर्यंत रस्त्यावर नागरिक कोणतेही नियम न पाळता फिरत होते.

thane latest news
नागरिकांनी तोबा गर्दी
author img

By

Published : May 13, 2021, 10:29 AM IST

Updated : May 13, 2021, 11:25 AM IST

ठाणे - राज्यात लॉकडाऊन असताना ठाण्यातील मुंब्रा येथे रमजानच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी नागरिकांनी तोबा गर्दी केली होती. रस्त्यावर पाय ठेवायला देखील जागा नव्हती, इतकी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळाली. लॉकडाऊन काळात कोरोना प्रतिबंधात्मक सर्व नियम धाब्यावर बसवून नागरिकांनी अशा प्रकारची गर्दी केली असताना प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा प्रकार समोर आला आहे. या गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव आणखीन वाढण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे तज्ञांचे मत आहे.

नागरिकांनी तोबा गर्दी

रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर मुंब्रा येथे प्रचंड गर्दी बघायला मिळाली, रस्त्यावरील गर्दीमुळे वाहनांना जायला देखील जागा नव्हती. रमजान नंतर येणारी ही ईद मुस्लीम बांधवांसाठी मोठा सण मानला जातो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री मुंब्रा इथल्या बाजारात होते. मात्र सध्यो कोरोनामहामारी टाळण्यासाठी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अमृतनगर ते कौसापर्यंत रस्त्यावर नागरिक कोणतेही नियम न पाळता फिरत होते. उद्या देखील अशाच प्रकारे गर्दी होण्याची शक्यता आहे. गर्दी आवरण्यासाठी पोलीस किंवा पालिका कर्मचारी कुठेही दिसून आले नाहीत, या गर्दीकडे बघून आटोक्यात आलेली कोरोना रुग्ण संख्या पुन्हा वाढण्याची भीती ठाणेकरांमध्ये दिसून येत आहे.

मुंब्र्यातील नागरिकांना कोरोनाचा विसर -

सध्या पद्धतीने घरात राहून आपले सण साजरा करावे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन केले होते. मात्र ही तोबा गर्दी पाहून मुंब्रातील नागरिकांना कोरोनाचा विसर पडला की काय? असा सवाल उद्भवला आहे.

मंत्र्यांच्या मतदारसंघात दुर्लक्ष -

कळवा-मुंब्रा परिसराचे आमदार जितेंद्र आव्हाड हे गृह निर्माण मंत्री असून यांच्या परिसरामध्ये नियमांची पायमल्ली झाल्यामुळे त्या परिसरात कारवाई करण्यासाठी प्रशासन घाबरत आहे. कारण या आधी प्रशासनानेही या परिसरातल्या व्हेंटिलेटरची आदला बदली केली होती आणि अशाच परिणाम म्हणून लोक रस्त्यावर उतरले आहेत.

हेही वाचा - राज्यातील उद्योगांना विशेष प्रोत्साहन देण्याचा मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय

Last Updated : May 13, 2021, 11:25 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.