ETV Bharat / state

खासगी रुग्णालयात रुग्णांना डांबून ठेवत डॉक्टरच्या घरावर सशस्त्र दरोडा; दागिनेसह रोकड घेऊन दरोडेखोर फरार - crores of jewelery looted from doctor house

डॉक्टरांच्या घरात घुसताच तीक्ष्ण हत्यारांचा धाक दाखवत दरोडेखारांनी डॉक्टरांच्या घरातील डिझिटल तिजोरी त्याचबरोबर सीसीटीव्हीचा डीव्हीआर दरोडेखोरानी ताब्यात घेतला. तिजोरीत तब्बल सवा कोटी चे सोने आणि हिऱ्यांचे दागिने होते, या डॉ दाम्पत्याने दरोडेखोरांना घाबरले, आणि तिजोरी कुठल्या खोलीत ठेवलेली आहे. ते सांगतच त्यानंतर दरोडेखोरांनी तिजोरी घेऊन कारमध्ये बसून पसार झाले. या दरोड्याची माहिती मिळतात रात्री उशिरा मोठमोठ्या पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन भेट दिली. सध्या पोलिसांकडून या दरोडाच्या तपास सुरू आहे, तसेच गुन्हे शाखेचे अधिकारी ही समांतर तपास करत आहे.

crores of jewelery were looted from the house of a doctor in ambernath
खासगी रुग्णालयात रुग्णांना डांबून ठेवत डॉक्टरच्या घरावर सशस्त्र दरोडा
author img

By

Published : Jul 14, 2022, 3:25 PM IST

Updated : Jul 14, 2022, 3:42 PM IST

ठाणे - एका खासगी रुग्णालयामधील रुग्णांना डांबून ठेवत रुग्णालयातील आया आणि नर्स यांचे मोबाईल हिसकावून घेत दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या डॉक्टरच्या घरावर तब्बल सव्वा कोटी रुपयांचा सशस्त्र दरोडा टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार अंबरनाथ पूर्व परिसरात घडला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात दरोडेखोरांविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

रुग्णांना चाकूचा धाक दाखवून लुटपाट - अंबरनाथमधील कानसई भागात उषा नर्सिंग होमचे डॉक्टर हरीश आणि उषा लापसीया यांच्या रुग्णालयात वरच असलेल्या घरावर काल रात्री साडेअकराच्या दरम्यान चार दरोडेखोरांनी हा दरोडा टाकला. दरोडेखोर पहिले रुग्णालयात घुसुन रुग्णांना चाकूचा धाक दाखवून लुटपाट केली. त्यानंतर रुग्णालयामधील आया आणि नर्सलाही चाकूचा धाक दाखवून त्यांचे मोबाईल काढून घेतले. रुग्ण अरोडाओरडा करून नये म्हणून या ह रुग्णांना एका खोलीत कोंडून ठेवले आणि त्यानंतर हॉस्पिटलच्या दुसऱ्या मजल्यावर डॉक्टरांच्या घरामध्ये घुसले.

सवा कोटीचे दागिने तिजोरीसह घेऊन पसार - डॉक्टरांच्या घरात घुसताच तीक्ष्ण हत्यारांचा धाक दाखवत दरोडेखारांनी डॉक्टरांच्या घरातील डिझिटल तिजोरी त्याचबरोबर सीसीटीव्हीचा डीव्हीआर दरोडेखोरानी ताब्यात घेतला. तिजोरीत तब्बल सवा कोटी चे सोने आणि हिऱ्यांचे दागिने होते, या डॉ दाम्पत्याने दरोडेखोरांना घाबरले, आणि तिजोरी कुठल्या खोलीत ठेवलेली आहे. ते सांगतच त्यानंतर दरोडेखोरांनी तिजोरी घेऊन कारमध्ये बसून पसार झाले. या दरोड्याची माहिती मिळतात रात्री उशिरा मोठमोठ्या पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन भेट दिली. सध्या पोलिसांकडून या दरोडाच्या तपास सुरू आहे, तसेच गुन्हे शाखेचे अधिकारी ही समांतर तपास करत आहे.

पोलिसांच्या हाती धागेद्वारे लागल्याची प्राथमिक माहिती - शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे तब्बल चार पथक या दरोडेखोरांना पकडण्यासाठी रवाना झाल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे, मात्र कॅमेऱ्यासमोर प्रतिक्रिया देण्यास पोलिसांनी नकार दिलाय. सध्या पोलीस हे जवळपासचे सीसीटीव्ही फुटेज तापसताय, दरम्यान पोलिसांच्या हाती काही धागेद्वारे लागल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे, मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात अंबरनाथ सारख्या वर्दळीच्या ठिकाणी हा दरोडा पडल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

Last Updated : Jul 14, 2022, 3:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.