नवी मुंबई - शहर परिसरात कोरोनाचा कहर वाढत असून दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत भरच पडत आहे. आज नवी मुंबईत 79 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. सकारात्मक बाब म्हणजे आज 38 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाहता नवी मुंबई शहराने धोक्याची पातळी ओलांडली आहे. नवी मुंबई शहरात आतापर्यंत 1,864 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून पैकी 11 हे इतर ठिकाणचे रहिवासी होते. आतापर्यंत नवी मुंबईत 10 हजार 773 लोकांची कोविड-19 ची चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये 8,021 जण निगेटिव्ह आले असून 899 जणांचे तपासणी अहवाल येणे प्रलंबित आहे.
सद्यस्थितीत नवी मुंबई शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1,853 इतकी आहे. आज 79 जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर 38 जण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत एकूण 840 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून घरी परतले आहेत. आज दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून आत्तापर्यंत 59 व्यक्ती कोरोनामुळे मृत्युमुखी पडल्या आहेत.