ETV Bharat / state

ठाण्यात वृद्धाचा कोरोनामुळे रस्त्यावर तडफडून मृत्यू; भीतीमुळे मदत मिळण्यास अडचण - thane corona update

प्रशासनाच्या या गलथान कारभार लोक बघत उभे होते. मात्र, इच्छा असतानाही भीतीमुळे कोणीही मदत केली नाही. ठाण्याच्या वागळे इस्टेट विभागातील शिवाजीनगरमधील ही घटना आहे.

ठाण्यात वृद्धाचा कोरोनामुळे रस्त्यावर तडफडून मृत्यू; भीतीमुळे मदत मिळण्यास अडचण

author img

By

Published : May 20, 2020, 10:05 PM IST

ठाणे - ठाण्यात माणुसकीला लाजवेल असा प्रकार घडला आहे. या प्रकारात मृत्युमुखी पडलेला हा व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याने कोणीही मदतीला समोर आले नाही. दोन तास रस्त्यावर ही व्यक्ती त्रासाने तडफडत होती. रुग्णवाहिकादेखील त्याठिकाणी पोहोचली होती. मात्र, रुग्णवाहिकेमध्ये ब्रदर आणि अटेंडंट नव्हते, चालकाकडे पीपीई कीट नव्हते, म्हणून त्याने हात लावला नाही. प्रशासनाच्या या गलथान कारभार लोक बघत उभे होते. मात्र, इच्छा असतानाही भीतीमुळे कोणीही मदत केली नाही. ठाण्याच्या वागळे इस्टेट विभागातील शिवाजीनगरमधील ही घटना आहे.

मंगळवारी या 60 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. सोमवारी या व्यक्तीला ताप येत होता. त्यावेळी त्याची चाचणी करण्यात आली. मात्र, ताप जास्त असल्याने त्याच्या मुलीने आधी त्याला कळव्याच्या शिवाजी महाराज रुग्णालयात आणि नंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात आणले. मात्र, दोन्हीकडे फक्त ताप असल्याने आणि रिपोर्ट उपलब्ध झाला नसल्याने भरती करण्यास नकार देण्यात आला. अखेर त्या मुलीने आपल्या वडिलांना घरी आणले. मात्र, काल त्यांचा ताप आणि त्रास दोन्ही वाढले. त्यानंतर हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी रुग्णालयातदेखील बोलवली. पण याचा काही फायदा झाला नाही. प्रशासनाच्या जाचक नियमांमुळे, माणुसकीला काळीमा फासणारी घटना ठाण्यात घडली आहे. या विषयात दोषी पालिका अधिकाऱ्यांवर कारवाई होणे आवश्यक आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.