ETV Bharat / state

कोरोना पॉझिटिव्ह असलेला खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी क्वारंटाईन केंद्रातून फरार

author img

By

Published : Jun 22, 2020, 5:09 PM IST

खून प्रकरणातील आरोपी बाळू खरात याला कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे टाटा आमंत्रण येथील क्वारंटाईन केंद्रात क्वारंटाईन करण्यात आले होते. तेथे असणाऱ्या गर्दीचा फायदा घेत खरात रविवराी दुपारी फरार झाल आहे. कोनगाव पोलिसांनी आरोपीची माहिती देणाऱ्यास बक्षीस जाहीर केले आहे. कोनगाव पोलिसात या आरोपीविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

balu kharat
बाळू खरात

ठाणे - कोरोना पॉझिटिव्ह असलेला खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी क्वारंटाईन केंद्रातून गर्दीचा फायदा घेऊन फरार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे या फरार झालेल्या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी बक्षीस जाहीर केले आहे. तर याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. बाळू खरात (वय, ४९ ) असे फरार झालेल्या आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.

कल्याण - भिवंडी रोडवरील राजणोली नाका बायपास येथील टाटा आमंत्रण मधील टोलेजंग इमारतीमध्ये कोरोना संशयित व बाधितांसासाठी शासकीय क्वारंटाईन केंद्र आहे. या केंद्रात कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील सुमारे एक हजारांच्यावर कोरोना संशयित व बाधितांवर उपचार सुरू आहेत. कल्याणमधील खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसापूर्वीच फरार आरोपीने एका व्यक्तीचा खून केला होता. त्याच खुनाच्या गुन्ह्यात बाळू खरात याला अटक केली असता, १६ जूनला त्याचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तेव्हापासूनच त्याला कोरोनाच्या उपचारासाठी टाटा आमंत्रण येथील क्वारंटाईन केंद्रात पोलिसांच्या देखरेखी खाली ठेवण्यात आले होते.

टाटा आमंत्रण येथील क्वारंटाईन केंद्रात जिल्ह्यातील ग्रामीण भागासह भिवंडी, उल्हासनगर , कल्याण - डोंबिवली या तिन्ही महापालिकेच्या हद्दीतील हजारो रुग्ण येथे उपचार घेत आहेत. त्यामुळे याठिकाणी दरदिवशी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. याच गर्दीचा फायदा घेऊन २१ जून रोजी दुपारच्या सुमारास कोरोना पॉझिटिव्ह असलेला हा ४९ वर्षीय आरोपी फरार झाला आहे.

पूर्वीही मुबंईतील एका कोरोनाबाधित रुग्णाने उपचार सुरू असताना इमारतीवरून उडी घेत फरार होण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्या घटनेत त्या रुग्णाच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्याचा पळून जाण्याचा बेत फसला होता. तेव्हापासून या क्वारंटाईन केंद्रात सीसीटीव्ही लावण्यात आले. आता तर खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी पळून गेल्याने याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात भादवि. २४४, १८८, २६९, २७१,सह कोविड प्रतिबंधक उपाययोजना नियमासह साथरोग प्रतिबंधक अधिनियानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यवंशी करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.