नवी मुंबई - गेल्या काही दिवसांपासून नवी मुंबई शहरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत प्रचंड वाढ होत आहे. ही मोठ्या प्रमाणावर होणारी वाढ लक्षात घेता नवी मुंबई शहरात 'मिशन ब्रेक द चेन' हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने नवी मुंबई शहरात आयुक्त अभिजित बांगर यांनी शहरातील मॉल्स, डिपार्टमेंटल स्टोअर्स, उद्याने बाजारपेठा अशा गर्दीच्या ठिकाणी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवे निर्बंध जाहीर केले आहेत.
मॉल्सच्या प्रवेशद्वारावर दर शुक्रवारी कोरोना चाचणी करणे बंधनकारक -
नवी मुंबई शहरातील प्रत्येक मॉलमधील प्रवेशद्वारावर दर शुक्रवारी दुपारी 4 वाजल्यानंतर व रविवारी दिवसभर कोरोना चाचणी (अँटीजेन टेस्ट) करणे बंधनकारक असणार आहे. या चाचणीचा अहवाल जर निगेटिव्ह असेल तरच मॉलमध्ये प्रवेश देण्यात येईल. तसेच इतरांना कोविड अहवाल निगेटिव्ह असल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. तसेच सामाजिक अंतर न पाळल्यास व गर्दी झाल्यास मॉल प्रशासनानाकडून 50 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल. हा दंड केवळ 2 वेळा आकारण्यात येईल तिसऱ्या वेळीही तीच परिस्थिती आढळून आली तर मॉल बंद करण्याचा आदेश देण्यात येईल.
उद्यानातही कडक निर्बंध-
उद्यानात कित्येक कुटूंब लहान मुलांना घेऊन येतात, बऱ्याचदा मास्क न लावणे सामाजिक अंतर न पाळणे अशी परिस्थिती असते त्यामुळे शहरातील उद्याने बंद ठेवण्याचा निर्णय नवी मुंबईचे मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनी दिला आहे.
कोरोना : नवी मुंबईत मॉल्स, डिपार्टमेंट स्टोर, उद्यानांवर नवे निर्बंध जाहीर
नवी मुंबई शहरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत प्रचंड वाढ होत आहे. ही मोठ्या प्रमाणावर होणारी वाढ लक्षात घेता नवी मुंबई शहरात 'मिशन ब्रेक द चेन' हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने शहरातील मॉल्स, डिपार्टमेंटल स्टोअर्स, उद्याने बाजारपेठा अशा गर्दीच्या ठिकाणी नवे निर्बंध जाहीर केले आहेत.