ठाणे - डोंबिवलीत एक व्यक्ती ऑस्ट्रेलियातून आल्यावर आपल्या राहत्या घरी आली होती. मात्र, त्या इमारीतीतील रहिवाशांनी कोरोनाच्या संशयातून त्यांना इमारतीत राहण्यास प्रतिबंध केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.
मात्र, ही घटना समजताच पोलिसांना डोंबिवलीतील रामनगर पोलिसांनी मध्यस्थी करत त्या ऑस्ट्रेलियातून आलेल्या नागरिकाला पोलीस ठाण्यात बोलावले. विमानतळावर आपली वैद्यकीय तपासणी केल्यावर कोरोना झाला नसल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. मात्र, रहिवाशांचा संताप पाहता पोलिसांनी त्या व्यक्तीस काही दिवसांसाठी डोंबिवलीत राहू नका, पुन्हा एकदा मुंबईतील कस्तुरबा रूग्णालया तपासणी करा, असा सल्ला दिला. मात्र, त्या व्यक्तीने दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश अहेर यांनी पत्रकारांना दिली.
दरम्यान, डोंबिवलीत परदेशातून आलेल्या व्यक्तींची वैद्यकीय तपासणी करा, त्याला कोरोनाची लागण झाली आहे का? ते तपासा असे अनेक नागरिक डोंबिवलीतील पालिकेच्या विभागीय कार्यालयात सांगण्यास येत असल्याची माहिती आरोग्य निरीक्षक विलास जोशी यांनी दिली. तर दुसरीकडे कोरोनामुळे जगात सर्तकता बाळगली आहे. त्यामुळे परदेशातून आलेल्या एखाद्या नागरिकाची पूर्ण तपासणी केल्यानंतर योग्य ती खबरदारी घेतल्यावर त्याला किमान 2 आठवडे आपल्या घरी रहावे, कोणाच्याशी संपर्कात राहू नये, असे आदेश राज्य सरकारने दिले आहे.
हेही वाचा - CORONA : गर्दी कमी केली नाही तर मुंबई लोकल बंद करावी लागेल - आरोग्य मंत्री राजेश टोपे