ठाणे - कल्याण डोंबिवली महापालिकेतील काँग्रेस नगरसेविकेने स्थायी समितीच्या निवडणुकीत भाजपला साथ दिली होती. यावर पत्रकारांनी विचालेल्या प्रश्नावर काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांनी अधिक न बोलता वरिष्ठांकडे बोट दाखवले आहे. त्यामुळे भाजपला मतदान करणाऱ्या काँग्रेसच्या नगरसेविकेवर पक्षाकडून कारवाई करण्यास दिरंगाई होत असल्याचे पहायला मिळत आहे.
कल्याण - डोंबिवली महापालिकेत नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या निवडणुकीत काँग्रेस नगरसेविकेने भाजपच्या उमेदवाराला मतदान केले. त्यामुळे शिवसेनेच्या ताब्यात असलेले स्थायी समितीचे सभापती पद भाजपकडे गेले. त्याला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक सचिन पोटे जबाबदार असल्याचा स्थानिक कार्यकर्त्यांनी आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मात्र, जिल्हाध्यक्ष पोटेंवरही कारवाईचा निर्णय पक्षातील वरिष्ठ नेते घेतील, असे सांगत याही प्रश्नावर सावंत यांनी वरिष्ठांकडे बोट दाखवले.
दरम्यान, नवी मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणूक महाविकास आघाडी एकत्रित लढवणार असून त्याच धर्तीवर कल्याण डोंबिवली महापालिकेची येणारी निवडणूक लढविली जाणार असल्याचे संकेत सचिन सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना दिले.
हेही वाचा - 'कोरेगाव-भीमा दंगलीतील 348, तर मराठा आंदोलनातील 460 गुन्हे मागे'
व्होडाफोन आयडियाने सरकारकडे केली 'ही' चक्रावून टाकणारी मागणी