ETV Bharat / state

काँग्रेस नगरसेवकास तिहारमधून धमकीचा फोन, अनधिकृत बांधकामाच्या विरोधात उठवला होता आवाज

ठाणे शहरामध्ये मोठ्याप्रमाणात अनधिकृत बांधकाम होत असल्याची तक्रार नगरसेवक विक्रांत चव्हाण यांच्याकडून सातत्याने होत आहे. गेल्या काही महिन्यात झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये चव्हाण यांनी अनधिकृत बांधकामांवरून अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. काँग्रेसच्या माध्यमातून सातत्याने महापालिकेच्या भ्रष्टाचाराचे वाभाडे काढल्यामुळे घाटकोपर येथील एका व्यक्तीने भेटण्यासाठी बोलवले. त्यावेळी ठाणे महापालिकेचा अधिकारी तेथे असल्याचा आणि त्यांच्यामार्फत फोनवरून तिहार जेलमधील अटक आरोपीने फोनवरून धमकावल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे.

नगरसेवक
नगरसेवक
author img

By

Published : Jun 2, 2021, 8:51 PM IST

Updated : Jun 2, 2021, 9:47 PM IST

ठाणे - ठाण्यातील काँग्रेस नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी अनधिकृत बांधकामांविरोधात आवाज उठवल्यामुळे धमकी मिळाल्याचा तक्रार अर्ज ठाणे पोलीसांकडे दिला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी चव्हाण यांनी ठाणे महापालिकेतील सहायक आयुक्तांचा, अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचे म्हटले आहे. तसेच तिहार तुरूंगामध्ये असलेल्या गुंडाकडून ही धमकी आल्याचा दावा चव्हाण यांनी केला आहे. या प्रकरणी ठाणे महापालिका आयुक्त आणि ठाणे पोलीसांकडेही चव्हाण यांनी तक्रार केली आहे. शहरातील अनधिकृत बांधकामांच्या विरोधात तक्रार केल्याने आणि भ्रष्टाचाराची प्रकरणी उघड केल्यामुळे ही धमकी दिली असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे.

बोलताना नगरसेवक

ठाणे शहरामध्ये मोठ्याप्रमाणात अनधिकृत बांधकाम होत असल्याची तक्रार नगरसेवक विक्रांत चव्हाण यांच्याकडून सातत्याने होत आहे. गेल्या काही महिन्यात झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये चव्हाण यांनी अनधिकृत बांधकामांवरून अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. काँग्रेसच्या माध्यमातून सातत्याने महापालिकेच्या भ्रष्टाचाराचे वाभाडे काढल्यामुळे घाटकोपर येथील एका व्यक्तीने भेटण्यासाठी बोलवले. त्यावेळी ठाणे महापालिकेचा अधिकारी तेथे असल्याचा आणि त्यांच्या मार्फत फोनवरून तिहार जेलमधील अटक आरोपीने फोनवरून धमकावल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे.

वरिष्ठ नेत्यांकडे केली तक्रार

या प्रकरणी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना याची माहिती देण्यात आली आहे. तसेच पोलीस प्रशासन आणि ठाणे महापालिका आयुक्तांकडे तक्रार करण्यात आल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. ठाणे शहरातील सर्व अनधिकृत बांधकामांविरोधात तत्काळ कारवाई करण्यात यावी. तसेच सहायक आयुक्तांची तत्काळ चौकशी करून कारवाई करावी, अन्यथा काँग्रेसच्या माध्यमातून व्यापक आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा चव्हाण यांनी यावेळी दिला.

हेही वाचा - भाजपा ओबीसींची दिशाभूल करत आहे - नाना पटोले

Last Updated : Jun 2, 2021, 9:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.