ठाणे- मुंबई हायवे पूर्वद्रुतगती महामहामार्गावरील कोपरी रेल्वे पूल अरुंद असल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. या अरुंद पुलाचे युद्ध पातळीवर सुरू असून बुधवारी खासदार राजन विचारे यांनी या कामाची पाहणी केली. यावेळी रेल्वे सुरू होण्यापूर्वी कोपरी गर्डरचे काम लवकरात लवकर पूर्ण करा, असा सज्जड दम त्यांनी अधिकाऱ्यांना दिला. तसेच कामामध्ये केलेली दिरंगाई मी सहन करणार नसल्याचेही ते यावेळी म्हणाले.
फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात हा मार्ग वाहतुकीसाठी सुरू करावा-
या पाहणी दौऱ्यात खासदार राजन विचारे यांनी 65 मीटर लांबीच्या 14 गर्डर पैकी फेज 1 च्या 7 गर्डरचे काम डिसेंबरच्या शेवटपर्यंत पुर्ण करण्याच्या सूचना रेल्वे अधिकाऱ्यांना दिल्या. त्यावरील कॉंक्रिटीकरणाचे (स्लॅपचे) काम जानेवारीच्या अंतिम आठवड्यात पूर्ण करून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात हा मार्ग वाहतुकीसाठी सुरू करावा व दुसऱ्या टप्प्यातील फेज 1ए च्या पुढील गर्डरचे काम तत्काळ सुरू करण्याच्या सूचना खासदार राजन विचारे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
तत्कालीन मुख्यमंत्र्यांची भेट मंजुरी मिळवली घेऊन-
1965 साली सार्वजनिक बांधकाम विभागाने रेल्वे कोपरी पुलाचे बांधकाम केले होते. त्यानंतर ठाण्याचे खासदार राजन विचारे यांना हा पूल धोकादायक झाल्याचे कळतात त्यांनी प्रत्यक्ष जागेवर पाहणी करून तत्कालीन मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या पुलाच्या बांधकामासाठी मंजुरी मिळवली. तसेच रेल्वे महाव्यवस्थापकांसोबत वारंवार बैठका घेऊन यासाठी नकाशांची मंजुरी एमएमआरडीए यांच्या अधिकाऱ्यांना मिळवून दिली. त्याबरोबर नौपाडा भास्कर कॉलनी येथील चिखलवाडी परिसरात दरवर्षी पावसाळ्यात पंधरा ते वीस फूट पाण्याची पातळी तयार होऊन नागरिकांचे नुकसान होत होते. यासाठी या ठिकाणी नाल्याची निर्मिती व नव्याने होणाऱ्या रेल्वेस्थानकाला ये-जा करण्यासाठी लागणाऱ्या भुयारी मार्गाची निर्मीती या कामांचा समावेश खासदार राजन विचारे यांनी या प्रकल्पामध्ये हे करून घेतला. 24 एप्रिल 2018 रोजी सुरू झालेल्या कोपरी पुलाचे बांधकाम मे 2021 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असताना कोरोना महामारीमुळे या पुलाचे काम रखडले होते. परंतु आता हे काम पुन्हा सुरू झाले आहे.