ETV Bharat / state

केवळ सुविधाच नव्हे तर वेळीच रुग्णसेवा व योग्य उपचार करा - मुख्यमंत्री

author img

By

Published : Jul 25, 2020, 7:35 PM IST

केवळ सुविधाच नव्हे तर वेळीच रुग्ण सेवा, योग्य उपचार मिळण्यास प्राधान्य द्यावे, असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. कल्याण-डोंबिवली हद्दीत कोविड समर्पित काळजी केंद्र आणि चाचणी प्रयोगशाळेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

Provide timely patient care and proper treatment, instructions of the C M Uddhav thackeray
केवळ सुविधाच नव्हे तर वेळीच रुग्ण सेवा व योग्य उपचार करा - मुख्यमंत्री

ठाणे - केवळ सुविधाच नव्हे तर वेळीच रुग्ण सेवा, योग्य उपचार मिळण्यास प्राधान्य द्यावे, असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. कल्याण-डोंबिवली हद्दीत कोविड समर्पित काळजी केंद्र आणि चाचणी प्रयोगशाळेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

मुंबई महानगर क्षेत्र परिसरात कोविडचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांनी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. केवळ मोठमोठया सुविधा उभारून चालणार नाही, तर योग्य पद्धतीने रुग्णसेवा, वैद्यकीय उपचार, पुरेशी ऑक्सिजन व्यवस्था तत्काळ उपलब्ध होणे गरजेचे आहे. संपूर्ण जगावर कोरोनाचे मोठे संकट आले. आज आपण या संकटाचा समर्थपणे मुकाबला करत आहोत. आरोग्याच्या सुविधा वाढवत आहोत, ही समाधानाची बाब असून रुग्णांचा शोध, तपासणी व उपचार या बाबींवर भर देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

राज्यात 131 प्रयोगशाळा उभारण्यात आल्या आहेत. कोरोनाबाधितांवर उपचारासाठी काही ठिकाणी आरोग्य सुविधांची तात्पुरत्या स्वरुपात उभारणी करण्यात आली असून, येणाऱ्या काळात या सुविधा कायमस्वरुपी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. प्रभावी औषधे हातात येईपर्यंत आपल्याला अधिक सजग असणे आवश्यक आहे. गलथानपणा आपल्याला परवडणारी नाही. आपल्याकडे सुरू असलेल्या उपचारांची गाईडलाइन तपासून घेणे आवश्यक आहे. राज्याच्या टास्कफोर्सकडून संबंधित यंत्रणेला मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले, तर कोरोनाबाबत नागरिकांच्या मनातील भय दूर करण्याबरोबरच त्यांना दिलासा देण्याबरोबरच समुपदेशन उपलब्ध करून देण्यात यावे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

डोंबिवली पूर्व येथील दावडी गावात कच्छी कडवा पाटीदार समाजाने पाटीदार भवनाची प्रशस्त जागा महापालिकेस उपलब्ध करून दिली आहे. ही इमारत तळ अधिक चार मजल्याची आहे. पहिल्या मजल्यावरील सुमारे 5000 स्क्वेअर फीटच्या प्रशस्त जागेत 70 खाटा आहेत. त्यापैकी 60 ऑक्सिजन सुविधा असलेले व 10 सेमी आयसीयू बेड असणार असून, दुसऱ्या मजल्यावर काम करणारे डॉक्टर्स, त्यांचा रहिवास, रेस्ट रुम, त्यांचे कार्यालय असणार आहे. तिसऱ्या मजल्यावर 5000 स्केअर फीटच्या प्रशस्त जागेत ऑक्सिजन सुविधा असलेल्या 70 खाटा व चौथ्या मजल्यावरदेखील ऑक्सिजन सुविधा असलेले 70 खाटा रुग्णांसाठी उपलब्ध असणार आहेत. बेसमेंटमध्ये कँन्टींन सुविधा उपलब्ध असून, सीसीटीव्ही कॅमेरे पाटीदार समाजाने पुरवले आहेत. सदर रुग्णालयात रुग्णांसाठी पंखे, वायफाय सिस्टिम तसेच रुग्णांचे तणावरहीत वातावरणात राहण्यासाठी मंद सुरावटीची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे. सदर रुग्णालयात 1 रुपी क्लिनीक डॉ. राहुल घुले यांच्यामार्फत चालवण्यात येणार असून, एकूण 2 एमडी फिजीशियन, 25 निवासी डॉक्टर, 50परिचारिका व 30 हाऊसकिपींगचा स्टाफ रुग्णांच्या सेवेसाठी तैनात राहणार आहे.

कोविड आरोग्य केंद्र कल्याण
कल्याण पश्चिम येथील आसरा फाऊंडेशनच्या प्रशस्त जागेत कोव्हिड आरोग्य केंद्र उभे राहत आहे. त्यामध्ये 100 ऑक्सिजनचे बेड, 84 नार्मल बेड, 10 सेमी आयसीयू बेडची सुविधा रुग्णांसाठी उपलब्ध आहेत. या सेंटरमध्ये 12 डॉक्टरर्स, 20 नर्सेस, 20 वॉर्डबॉय आणि फिजीशियन देखील उपलब्ध असतील.

कल्याण येथे सुसज्ज प्रयोगशाळा -
कल्याण पश्चिम गौरीपाडा येथे महापालिकेचे स्वत:चे सुसज्ज स्वॅब चाचणी केंद्र पी.पी.पी. तत्वावर कृष्णा डायग्नोस्टिक यांच्या माध्यमातून तयार होत आहे. तेथे दररोज 3000 चाचण्या होवू शकतात. यावेळी पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील कोरोनाचे आव्हान पेलण्यासाठी ठाणे जिल्हा सज्ज आहे. येणाऱ्या काळात या भागातील संसर्ग परिणामकारकरित्या रोखू तसेच उत्तम सुविधांची उभारणी करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कल्याण डोंबीवली महापालिका परिसरात रुग्णांचे वाढते प्रमाण लक्षात घेता कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढवले आहे. महापालिका व लोकप्रतिनिधी एकत्र मिळून काम करत आहेत. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळत असल्याचे शिंदे म्हणाले. महापालिकांना अर्थिक मर्यादा आहेत. परंतु, मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनानुसार आवश्यक त्या सुविधा उपलब्ध होत आहेत. ट्रँकींग व ट्रेसिंगवर विशेष भर देण्यात येत असून येथील नागरिकांना सर्व सुविधा कल्याणमध्येच उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याचेही शिंदे यांनी सांगितले. मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका काय उपाययोजना करीत आहे त्याविषयी सांगितले.

यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, आमदार राजू पाटील, विश्वनाथ भोईर, रवींद्र चव्हाण महापौर विनिता राणे, सभापती स्थायी समिती विकास म्हात्रे यांसह नगरसेवक, मनपा अधिकारी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.