ETV Bharat / state

ठाणे: खाऊ आणि भेटवस्तू मिळाल्याने बच्चे कंपनीने लुटला बालदिनाचा आनंद - बालदिन

सिवूड इथल्या कै. मास्टर विनायक नाईक विद्यालय क्र. 5 मध्ये भाजप युवा मोर्चाचे महामंत्री रणजित नाईक यांच्या वतीने बालगोपाळाना बलदिनाच्या निमित्ताने खाऊवाटप करण्यात आला.

बालदिन
author img

By

Published : Nov 15, 2019, 3:13 AM IST

ठाणे - लहानग्यांचे बालपण साजरा करणारा दिवस म्हणजे 'बालदिन'. नेहमीप्रमाणे शाळेत गेल्यावर आपला गृहपाठ तपासणार आणि शिक्षकांची शिकवणी होणार, असा विचार करत गेलेल्या विद्यार्थ्यांनी 'बालदिनी' दिवशी वेगवेगळा खाऊ आणि भेटवस्तू मिळाल्याने हा दिवस जल्लोषात साजरा केला.

बच्चे कंपनीने लुटला बालदिनाचा आनंद

शिक्षक वर्गात आल्यानंतर नेहमी शांत असलेली शाळांचे वर्ग बालदिनी विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजून गेली होती. सिवूड इथल्या कै. मास्टर विनायक नाईक विद्यालय क्र. 5 मध्ये भाजप युवा मोर्चाचे महामंत्री रणजित नाईक यांच्या वतीने बालगोपाळाना बलदिनाच्या निमित्ताने खाऊवाटप करण्यात आला. देशाचे भवितव्य ज्यांच्या हातात आहे, त्यांना घडवताना प्रत्येकाने आपल्यातले लहान मुल सदैव जपले पाहिजे. तरच संवेदना कायम रहातील, अशी प्रतिक्रिया यावेळी रणजित नाईक यांनी दिली.

हेही वाचा - भाजपच्या नवनिर्वाचित 105 आमदारांची 'वसंत स्मृती' येथे बैठक

यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना रणजित नाईक यांनी चाचा नेहरू यांच्याबद्दल माहिती दिली. सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या. शिक्षकांचा ओरडा नाही तर आवडता खाऊ मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते. बालदिनाचा हा उपक्रम राबवल्याबद्दल पालकांनी रणजित नाईक यांचे आभार मानले. विशेष म्हणजे यावेळी विद्यार्थ्यांच्या सोबत शिक्षकांनी ही आपले बालपण आठवून त्यांच्या या उत्सवात सहभाग घेतला.

हेही वाचा - शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांसाठी विठ्ठलाला साकडे, दाम्पत्याने केली अनवाणी पायी वारी

Intro:सोबत व्हिडीओ जोडला आहे
पनवेल

लहानग्यांचे बालपण साजरा करणारा दिवस म्हणजे बालदिन.... नेहमीप्रमाणे आज शाळेत गेल्यावर आपला गृहपाठ तपासणार आणि शिक्षकांची शिकवणी होणार, असा विचार करत गेलेल्या विद्यार्थ्यांनी आजच्या दिवशी वेगवेगळा खाऊ आणि वस्तू मिळाल्यानं आजचा बालदिन मोठ्या जल्लोषात साजरा केला. Body:शिक्षक वर्गात आल्यानंतर नेहमी शांत असलेले शाळांची वर्ग आज च्या बालदिनी विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजून गेली होती. सिवूड इथल्या कै. मास्टर विनायक नाईक विद्यालय क्र. 5 मध्ये भाजप युवा मोर्चाचे महामंत्री रणजित नाईक यांच्या वतीने बालगोपाळाना आजच्या बलदिनाच्या निमित्ताने खाऊवाटप करण्यात आलं. देशाचं भवितव्य ज्यांच्या हातात आहे त्यांना घडवताना प्रत्येकाने आपल्यातले लहान मुल सदैव जपले पाहिजे. तरच संवेदना कायम रहातील, अशी प्रतिक्रिया यावेळी रणजित नाईक यांनी दिली.
Conclusion:यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना रणजित नाईक यांनी चाचा नेहरू यांच्याबद्दल माहिती दिली. सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या. आज शिक्षकांचा ओरडा नाही तर आवडता खाऊ मिळाल्यानं विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते. बालदिनाचा हा उपक्रम राबवल्याबद्दल पालकांनी रणजित नाईक यांचं आभार मानलं. विशेष म्हणजे यावेळी विद्यार्थ्यांच्या सोबत शिक्षकांनी ही आपलं बालपण आठवून त्यांच्या या उत्सवात सहभाग घेतला.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.