ETV Bharat / state

क्रिकेट खेळताना मुलाच्या हातात घुसली लोखंडी गेटची सळई

क्रिकेट खेळत असताना चेंडू आणण्यासाठी गेलेल्या ११ वर्षीय मुलाच्या हातामध्ये सोसायटीच्या लोखंडी गेटची सळई घुसल्याची घटना दुपारी घडली.

क्रिकेट खेळताना मुलाच्या हातात घुसली लोखंडी गेटची सळई
author img

By

Published : Apr 30, 2019, 8:48 PM IST

ठाणे - क्रिकेट खेळत असताना चेंडू आणण्यासाठी गेलेल्या ११ वर्षीय मुलाच्या हातामध्ये सोसायटीच्या लोखंडी गेटची सळई घुसल्याची घटना दुपारी घडली. ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन मुलाची सुखरूप सुटका करुन त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले. हर्ष राजेश शिंदे (वय ११, रा.लुईसवाडी) असे जखमी मुलाचे नाव आहे.

उन्हाळ्याची सुट्टी पडल्याने शाळकरी मुले सोयायटीच्या आवारात क्रिकेट खेळतात. हर्ष हाही आपल्या मित्रांसमवेत क्रिकेट खेळत होता. त्यावेळी चेंडू घरोडिया अपार्टमेंट या सोसायटीमध्ये गेला. त्यावेळी चेंडू आणण्यासाठी गेल्यावर सोसायटीच्या गेटवरून उडी मारत असताना गेटवरील धारदार लोखंडी सळई हर्षच्या उजव्या हातात आरपार घुसली.

त्यावेळी सोबतच्या मित्रांनी स्थानिकांना बोलवले. तसेच अग्निशमन दलालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दल व आपत्ती व्यवस्थापनाने जखमी हर्षची मुक्तता करून त्याला रुग्णालयात दाखल केले. हर्षच्या हाताला गंभीर दुखापत झाल्याचे त्याच्या पालकांनी सांगितले.

Intro:
क्रिकेट खेळताना मुलाच्या हातात घुसली लोखंडी गेटची सळी
Body:

क्रिकेट खेळत असताना चेंडू आणण्याच्या नादात ठाण्यातील 11 वर्षीय मुलाच्या हातामध्ये सोसायटीच्या लोखंडी गेटची सळी घुसल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली.हर्ष राजेश शिंदे ( 11 ) रा.लुईसवाडी असे जखमी मुलाचे नाव असून ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशामक दलाचे जवानांनी धाव घेऊन त्याची सुखरूप सुटका करीत त्याला सिव्हिल रुग्णालयात दाखल केले.
उन्हाळ्याची सुट्टी पडल्याने शाळकरी मुले सोयायटीच्या आवारात क्रिकेट खेळतात.ठाण्यातील लुईसवाडी येथे राहणाऱ्या हर्ष राजेश शिंदे हादेखील आपल्या मित्रांसमवेत क्रिकेट खेळत असताना चेंडू घरोडिया अपार्टमेंट या सोसायटीमध्ये गेला.तेव्हा,चेंडू आणण्यासाठी सोसायटीच्या गेटवरून उडी मारत असताना गेटवरील धारदार लोखंडी सळी हर्षच्या उजव्या हातात आरपार घुसली.यावेळी सोबतच्या मित्रांनी रहिवाश्याना बोलावून घेतल्याने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दल व आपत्ती व्यवस्थापनाने जखमी हर्षची मुक्तता करून त्याला सिव्हिल रुग्णालयात दाखल केले आहे.हर्षच्या हाताला गंभीर दुखापत झाली असल्याचे त्याच्या पालकांनी सांगितले.

Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.