ठाणे Eknath Shinde :: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिवाळी सणानिमित्त कालपासून ठाण्यातील विविध ठिकाणी भेटी देत आहेत. काल त्यांनी कोपरी इथल्या कार्यक्रमाला भेट दिली होती. त्यानंतर त्यांनी कोपरी सिद्धिविनायक चौकात तंदूर वडा पावचा आस्वाद घेत, सहकाऱ्यांना वडा पाव खायला दिला होता.
मिसाळचा घेतला अस्वाद : आज सकाळी त्यांनी पुन्हा एकदा टेंभी नाक्यावर रवींद्र फाटक यांच्या दिवाळी पहाट कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमालाही भेट दिली. त्यांनी ठाण्यातील प्रसिद्ध मिसाळचा अस्वाद घेतला. यावेळी आमदार प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक यांची देखील उपस्थिती होती.
दिवाळी पहाटमुळं ठाण्यात वाहतूक कोंडी : आज सकाळपासूनच ठाण्यातील विविध रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. दिवाळी पहाटच्या कार्यक्रमांमुळं विविध राजकीय पक्षांनी सकाळपासूनच कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. त्यामुळं स्टेशन रोड पूर्णपणं बंद होता. या कार्यक्रमाला हजारो नागरिकांची गर्दी झाली होती. त्यामुळं रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊन अनेकांना त्रास सहन करावा लागला. या वाहतुकीतून सुटका करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पायी चालत जाऊन मिसळवर ताव मारला.
मुख्यमंत्र्यांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा : मिसाळचा स्वाद घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. "सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा, ही दिवाळी सर्वांना सुखाची, समृद्धीची, आनंदाची जावो", अशा शुभेच्छा त्यांनी राज्यातील जनतेला दिल्या. "आमचं सरकार आल्यापासून सर्व निर्बंध हटवले आहेत. दसरा-दिवाळी सगळे सण साजरे होत आहेत. आपल्या सणांची परंपरा आपण वाढवली पाहिजे" असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
सण पर्यावरणपूरक पद्धतीनं साजरे करा : "आपण सर्वांनी सण पर्यावरणपूरक पद्धतीनं साजरे करुन संस्कृतीचं जतन करायला हवं", असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. सर्वसामान्यांची दिवाळी खराब होऊ नये, यासाठी राजकारण्यांनी प्रयत्न करावेत. राजकारण करण्याची भरपूर संधी आहे. दिवाळी हा सण सर्वसामान्यांच्या जीवनात आनंदाचा, समृद्धीचा क्षण आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आगामी महापालिका लोकसभा, विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्वच राजकीय पक्षांनी दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. त्यामुळं अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाल्याचं दिसून आलं.
हेही वाचा -
- Fadnavis Appeal On Diwali: फटाके फोडा, दिवे लावा, पण प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्या; देवेंद्र फडणवीसांचं आवाहन
- Diwali 2023 : शिर्डीत दिवाळीचा जल्लोष; आंध्र प्रदेशच्या साईभक्तानं दिलं तब्बल 12 लाखांचं दान
- Diwali 2023 : राजकारणातील 'कारीट' नंतर फोडणार आज फक्त. . , अनिल परब यांनी सूचक इशारा देत दिल्या शुभेच्छा